ICC Men’s Cricket World Cup 2023: 27 वर्षांची प्रतीक्षा संपली, आयसीसी विश्वचषकासाठी पुण्यातील MCA क्रिकेट स्टेडियम सज्ज
ICC Men’s Cricket World Cup 2023 : एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) क्रिकेट विश्वचषक सामन्यांची पुण्याची प्रतीक्षा तब्बल 27 वर्षांनंतर अखेर संपली आहे कारण मंगळवारी जाहीर झालेल्या विश्वचषक सामन्यांच्या वेळापत्रकात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) गहुंजे स्टेडियमचा उल्लेख होता, जिथे पाच सामने खेळले जातील. पुण्यासाठी हा ऐतिहासिक क्षण असेल कारण एमसीए स्टेडियम त्याच्या इतिहासातील पहिला विश्वचषक सामना देखील आयोजित करेल. (after-27-years-of-long-wait-five-icc-world-cup-matches-to-be-played-in-pune)
27 वर्षांपूर्वी पुण्यातील स्वारगेट येथील नेहरू स्टेडियमवर 1996 च्या आयसीसी विश्वचषकाचा सामना आयोजित करण्यात आला होता. हा सामना 29 फेब्रुवारी रोजी केनिया विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यात झाला होता ज्यात केनियाने 73 धावांनी विजय मिळवला होता.
गहुंजे येथील एमसीए स्टेडियमला 2011 मध्ये आयसीसी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करायचे होते, परंतु स्टेडियमचे बांधकाम वेळेत पूर्ण न झाल्याने पुण्याने विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी गमावली. हे बांधकाम 2010 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु ते 2012 पर्यंत लांबले.
त्याच वर्षी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा आयसीसी विश्वचषक जिंकून इतिहास घडवला होता. गहुंजेचे एमसीए स्टेडियम आता 19 ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या सामन्यासह सामने आयोजित करण्यासाठी सज्ज झाले आहे.
“आयसीसी विश्वचषक सामन्यांसाठी आवश्यक मूलभूत सुधारणा आणि देखभाल सप्टेंबरच्या अखेरीस पूर्ण केली जाईल. MCA गहुंजे स्टेडियम हे आपल्या देशातील सर्वात आधुनिक स्टेडियमपैकी एक आहे. आम्हाला फक्त तिकीट काउंटर, पार्किंग इत्यादी सुविधा अपग्रेड कराव्या लागतील. हे सप्टेंबर अखेरीस पूर्ण होईल”, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले.
‘वानखेडे’चं महत्त्व संपलं?; IPLनंतर वर्ल्डकपचा अंतिम सामनाही गुजरातमध्ये!
यंदाच्या विश्वचषकाचे पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर खेळले जाणारे सामने
1) भारत विरुद्ध बांगलादेश, 19 ऑक्टोबर 2023
2) अफगाणिस्तान वि क्वालिफायर II, 30 ऑक्टोबर 2023
3) न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 1 नोव्हेंबर 2023
४) इंग्लंड वि क्वालिफायर I, 8 नोव्हेंबर 2023
5) ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश, 12 नोव्हेंबर 2023