हे यश जबाबदारी वाढवणारे; महापालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सनी निम्हण यांनी व्यक्त केली भावना

मतदारांनी दाखवलेला हा विश्वास अमूल्य आहे, अशी भावना विजयानंतर नवनिर्वाचित नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांनी व्यक्त केली.

Untitled Design (274)

Untitled Design (274)

Sunny Nimhan expressed his feelings : औंध-बोपोडी प्रभाग क्रमांक 8 मधील मतदारांनी भरभरून प्रेम दिल्याने महापालिका निवडणुकीत मला स्पष्ट आणि निर्णायक कौल मिळाला आहे. एकूण झालेल्या मतदानांपैकी तब्बल 51 टक्के मते माझ्या पारड्यात पडली असून, मतदारांनी दाखवलेला हा विश्वास अमूल्य आहे, अशी भावना विजयानंतर नवनिर्वाचित नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांनी व्यक्त केली.

या विजयानंतर प्रतिक्रिया देताना निम्हण म्हणाले की, आज मिळालेले हे यश म्हणजे केवळ वैयक्तिक विजय नसून, नागरिकांनी विकासाला दिलेले मत आहे. प्रभागातील मूलभूत सुविधा, पायाभूत विकास, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी लोकांनी मला संधी दिली आहे. हा विश्वास आनंद देणारा असला तरी जबाबदारी वाढवणारा आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे.

पुढे बोलताना त्यांनी औंध-बोपोडी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आराखडा तयार असल्याचे स्पष्ट केले. “पुढील 100 दिवसांचा सविस्तर रोड मॅप तयार असून, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी येत्या 1 फेब्रुवारीपासून सुरू होईल. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, उद्याने, आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावले जातील. नागरिकांच्या सहभागातून आणि पारदर्शकतेतून विकासकामे केली जातील,” असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला.

नाईकांनी म्हटल्या प्रमाणे शिंदेंचा टांगा पलटी केलाच;नवी मुंबईत पुन्हा एकदा गणेश नाईकांचे वर्चस्व

या विजयामागे अनेक घटकांची साथ लाभल्याचे नमूद करताना निम्हण म्हणाले की, माजी कार्यसम्राट आमदार स्वर्गीय विनायक निम्हण आबा यांची पुण्याई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेला विश्वास, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिलेले खंबीर पाठबळ, तसेच भाजपचे असंख्य कार्यकर्ते आणि आबा प्रेमींची साथ याच बळावर हे यश मिळाले आहे.

शेवटी त्यांनी प्रभागातील सर्व मतदारांचे, समर्थकांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत सांगितले की, औंध-बोपोडी प्रभागाचा विकास हाच आपला एकमेव अजेंडा असून, प्रत्येक नागरिकाच्या अपेक्षांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. “हा विजय लोकांचा आहे आणि काम करताना तो कायम लक्षात ठेवूनच पुढे वाटचाल करणार,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

Exit mobile version