Sunny Nimhan On Devendra Fadnavis : पुणे महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून 15 जानेवारी रोजी पुणे महापालिकेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. यावेळी मुख्य लढत महायुतीमधील दोन्ही घटक पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. महायुतीमध्ये होत असलेल्या मुख्य लढतीमुळे पुण्यात कोण? बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी लेट्सअप मराठीशी विशेष संवाद साधला. लेट्सअप मराठीशी बोलताना त्यांनी अनेक खुलासे करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निम्हण यांच्या घरी का आले होते? त्याबाबत किस्सा शेअर केला आहे.
लेट्सअप मराठीशी बोलताना माजी नगरसेवक सनी निम्हण (Sunny Nimhan) म्हणाले की, तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विधानसभा 2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान घरी आले होते. पाडव्याच्या दिवशी ते आले होते आणि त्याच दिवशी आमच्या वडिलांच द्वितीय पुण्यस्मरणही होतं. त्या दिवशी ते आले होते आणि त्यांनी थोडस सल्ला मसलद आणि काही राजकीय गोष्टी सांगितल्या.
तेव्हापासून मला कायम जाणवते की त्यांचा आज हात आमच्या पाठीवर कायम आहे. तर यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं होतं का? या प्रश्नावर बोलताना सनी निम्हण म्हणाले की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक होतो आणि माझे प्रयत्नही चालू होते. लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी एक माध्यम किंवा त्या सभागृहामध्ये जाणं गरजेचं आहे. त्यामुळे माझे प्रयत्न सुरु होते.
सैनिकांसाठी सोशल मीडिया नियमांमध्ये मोठा बदल, इन्स्टाग्राम ‘व्ह्यू-ओन्ली’ मध्ये पाहण्याची परवानगी-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझे वडील (दिवंगत माजी आमदार विनायक निम्हण) 1999 पासून एकत्र सभागृहामध्ये होते आणि ते कायम वडीलकीच्या नात्यानेच आमच्याशी आहेत आणि कुटुंबिक आमचं रिलेशन आहे. त्यांनी मला सांगितलं की, जे विनायक तुझ्यामध्ये पाहतोय किंवा जे ते बघत होते त्याच पद्धतीने माझं कायम तुला सहकार्य राहील किंवा मी त्या वडीलकीच्या नात्यानेच मी तुझ्याबरोबर आहे असं त्यांनी तेव्हा मला सांगितलं होतं. असं लेट्सअप मराठीशी बोलताना माजी नगरसेवक सनी निम्हण म्हणाले.
