पुणे : काँग्रेसला मोठा धक्का दिल्यानंतर आता भाजप शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. पवारांचे निकटवर्तीय जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर खासदार सुप्रिया सुळेंनी (Supria Sule) प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, भाजपमध्ये मी स्वतः, रोहितसह अनेकजण जाणार याची चर्चा असते. पण भाजपकडे 200 आमदार 500 खासदार एवढा मोठा लवाजमा असतानाही भाजपला आमच्या लोकांची गरज लागते म्हणजे आमच्याकडे काहीतरी टॅलेंट नक्कीच आहे असे म्हणत सुळेंनी भाजपची अक्षरक्षः चिरफाड केली आहे. (Supria Sule On Jayant Patil )
राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत! आता शरद पवारांचा निकटवर्तीय नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?
सुळे म्हणाल्या की, भाजपचे भ्रष्टाचार जुम्ला पार्टी हे मॉडेल तयार झाले आहे. ज्याच्यावर आरोप करतात दुसऱ्या दिवशी तोच नेता भाजपमध्ये जातो. पण या सगळ्यामध्ये भाजपकडे एवढी मोठी ताकद असताना त्यांना आमच्या सारख्या छोट्या पक्षांमधील लोकांची गरज लागते म्हणजेच आमच्यात काही तरी टॅलेंट नक्कीच आहे. यावेळी सुळे यांनी राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या भेटीविषयीपण भाष्य केले. त्या म्हणाल्या की, भाजप आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा आहे. भाजपनं पक्ष फोडले, घरं फोडले एवढेच नव्हे तर, इन्कम टॅक्स, ईडीचा ससेमीरा अनेकांच्या मागे लावला. एवढं झाल्यानंतरही भाजपचं राजकारण संपलेले नाही.
पवारांसोबत असतांना विलासरावांचा फोन, जयंत पाटलांना सांगितला ‘तो’ किस्सा
फडणवीसांकडे गृहमंत्रीपद आल्यापासून गुन्हेगारीत वाढ
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील विविध भागात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यात पुणे, नागपूर आणि ठाणे या तिन्ही ठिकाणी गुन्हेगारी वाढली आहे. वाढती गुन्हेगारी हे गृगमंत्रालयाचे अपयश असल्याची टीका यावेळी सुळेंनी केली. मी राजीनामा मागितला की माझ्यावर टीका केली जाते. परंतु, राज्याचे गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांकडे आल्यापासून राज्यातील गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी गृहमंत्रालयाचे ऑडिट करणे गरजेचे असल्याची मागणी सुळेंनी यावेळी केली.