Supriya Sule On Sanjay Gaikwad: आमदार निवासमधील (MLA residence) कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याने निकृष्ट जेवण दिल्यामुळे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी थेट कर्मचाऱ्याला मारहाण केलीये. यावर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) भाष्य केलं. जर आमदार निवासामध्ये आमदारच मारामारी करू लागले, तर आपण महाराष्ट्रातील नागरिकांना नेमका कोणता आदर्श देणार आहोत?, असा सवाल सुळेंनी व्यक्त केला.
कुणबी प्रमाणपत्र अडवण्यावरून जरांगे पाटील भडकले; मंत्री शिरसाटांवर केला गंभीर आरोप
राज्यात सध्या खोट्या शासकीय निर्णय (जीआर) प्रसारित करून जनतेची दिशाभूल करण्याचे गंभीर प्रकार वाढत आहेत. तसेच पुणे शहरात विविध गुन्हेही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंनी पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनला भेट दिली. यावेळी ग्रामविकास विभागाचे बनावट शासन निर्णय काढून त्याद्वारे संबंधित कामासाठी कोट्यवधीचे कंत्राटे दिल्याचा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात समोर आला आहे. ही शासनाची फसवणूक असून सामान्य जनतेच्या पैशाचा अपहार आहे. त्यामुळे असे बनावट शासन निर्णय काढणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुळेंनी केली. तसेच पुण्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, त्याला आळा घालण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असंही सुळे म्हणाल्या.
विनाअनुदानित शिक्षकांना दिलासा, ‘या’ दिवशी मिळणार पगार, मंत्री गिरिष महाजनांची मोठी घोषणा
याप्रसंगी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विशाल तांबे, सचिन दोडके, सोपान (काका) चव्हाण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
सरकार गुन्हा नोंदवताना दिसत नाहीये
त्यानंतर माध्यमांशी बोलताना सुळे म्हणाल्या की, एका आमदाराने आमदार निवासात हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. आमदार निवासात काही आमदार राहण्यासाठी येत असतात. मी समजू शकते की, जेवण खराब असेल. पण याची तक्रार कम्प्लेंट बुकमध्ये करण्याची गरज होती. प्रत्येक ठिकाणी कम्प्लेंट बुक असतात. पण आमदार निवासात अशी मारहाण करत असाल तर आपण काय आदर्श महाराष्ट्राला देणार आहोत? या प्रकरणी सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची गरज होती, पण सरकार गुन्हा नोंदवताना दिसत नाही. विरोधी पक्षाने काही केले नाही तरी, आमच्या घरापर्यंत ईडी पोहोचते, ही बाब खूप दुर्दैवी आहे, असंही सुळे म्हणाल्या.
आंदोलकांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करा
गेल्या चार दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात विनाअनुदानित शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. याविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी गेली ५६ वर्षे विविध राज्य व राष्ट्रीय संस्थांमध्ये कार्यरत आहे. शासन-प्रशासन कसे चालवायचे, निर्णय कसा घ्यायचा हे मला शिकवण्याची गरज नाही. त्यामुळे राज्य सरकारने कोणतीही सबब न देता आंदोलकांच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात, असं त्या म्हणाल्या.