Download App

सुप्रिया सुळे यांची थेट गृहमंत्र्यांकडे मोठी विनंती; म्हणाल्या, ‘माझी पोलीस सुरक्षा व्यवस्था…’

Supriya Sule: या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. आता या प्रकरणावरुन सुप्रिया सुळे यांनी एक ट्वीट केले आहे.

Supriya Sule Request DCM Devendra Fadnavis: गेल्या काही दिवसांत देशामध्ये महिलावर लैंगिक अत्याचाराच्या धक्कादायक घटनांमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. (Badlapur Sexual Assault) कोलकाता बलात्कार आणि खून प्रकरणानंतर (Kolkata Sexual Assault) आता बदलापूरमधील शाळकरी विद्यार्थिंनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. बदलापूरमधील आदर्श महाविद्यालयातील दोन चिमुकल्या विद्यार्थींनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सर्वच स्तरातून जोरदार संताप व्यक्त केला जात आहे. आता या घटनेबद्दल सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी गृहमंत्र्यांकडे मोठी विनंती केली आहे.


सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना (Chief Minister Eknath Shinde) टॅग करत एक मोठी विनंती केली आहे. ( DCM Devendra Fadnavis ) महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गेली काही महिन्यांपासून अतिशय गंभीर आहे. जनता असुरक्षित वातावरणात जगत असून सततच्या अप्रिय घटनांमुळे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. महिला, अबालवृद्ध कुणीही सुरक्षित नाहीत. गुन्हेगार निर्ढावले असून कायद्याचा धाक उरलेला नाही. यंत्रणा राबविताना पोलीस यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण पडतोय,हे स्पष्टपणे दिसत आहे.

दुसरीकडे माझ्यासह अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी मोठी पोलीस यंत्रणा काम करत आहे. परंतु एका बाजूला कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणेचं बळ कमी पडत असताना दुसरीकडे हि सुरक्षा घेणं योग्य नाही. म्हणून गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की कृपया माझ्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा तातडीने काढून घ्यावी. माझ्या सुरक्षेसाठी दिलेले हे पोलीस अधिकारी जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करावेत. यासोबतच राज्यातील ज्यांना ज्यांना सुरक्षा व्यवस्था दिली आहे त्या सर्वांच्या सुरक्षेच्या गरजेबाबत तातडीने आढावा घ्यावा व ज्यांना गरज नाही, त्यांची सुरक्षा काढून ते पोलीस कर्मचारी जनतेच्या सुरक्षेसाठी देण्यात यावे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था चोख राहावी व जनतेला सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी गृहमंत्र्यांनी हा निर्णय तातडीने घ्यावा ही नम्र विनंती., अशी पोस्ट करत एक मोठी विनंती केली आहे.

Badlapur Sexual Assault: बदलापूरमधील शाळकरी विद्यार्थिंनींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी अनेक सेलिब्रिटींची संतप्त प्रतिक्रिया

पुढे म्हणाले की, प्रत्येकाला माझ्यावर टीका करण्याचा अधिकार

ममता बॅनर्जी अतिशय संवेदनशील पणे प्रतिक्रिया दिले होते. या अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. सरकार कोणताही बलात्कारासारखी घटना घडल्यावर त्याचा निषेध आम्ही करणारच. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला का? लोकशाहीमध्ये तो त्यांना अधिकार आहे… तुम्हाला व्हिडिओ पाठवते तो बघा मी काय म्हणाले होते. आंदोलन झाला नसता तर बदलापूर मधले घटना कधीच उघडकीस आली नसते. महिलांची भावना यांना कळलीच नाही. अशी टीका रुपाली चाकणकर यांच्यावर केले आहे.

डीसीएम ने CM तीन लोकांवर ॲक्शन घेतले पाहिजे.

तीन लोकांनी आम्हाला बहिणींना धमक्या दिल्या आहेत. तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही? देवेंद्र चे मुख्यमंत्री झाले नाही तर ?ही योजना होणार नाही ? आम्ही तुमचे पैसे बंद करू.. या तीन लोकांचे नाव त्यांना कळवा…हे लोक वाकड्या नजरेने अणि खूपच वाईट नजरेने तुमच्या योजनेकडे बघतायेत आणि ते तुमचेच मित्र पक्ष आहेत.शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने महिला पत्रकाराबद्दल जे बोलले त्याचा निषेध करते. त्याची मानसिकता यातून दिसते. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर जिजाऊंच्या स्वप्नातलं जे शासन आहे ते आम्ही महिला आणि राज्यात आणणार आहोत. हा प्रश्न तुम्ही पालकमंत्र्यांना विचारला पाहिजे. मी त्या घटनेबद्दल माहिती घेतली आहे, असा निशाणा सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर केले आहे.

follow us