Sushma Andhare on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे. यावरुन सुषमा आंधारे (Sushma Andhare) यांनी जोरदार टीका केली आहे. मोदींना वाराणसी (Varanasi) मतदारसंघातून पुन्हा निवडून येण्याचा विश्वास नसेल त्यामुळे त्यांना पुण्यासारखा सुरक्षित मतदारसंघ पाहिजे असेल, असा असा हल्लाबोल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा आंधारे यांनी लेट्सअप मराठी बोलताना केला.
त्या म्हणाल्या की नरेंद्र मोदी पुण्यातून निवडणूक लढवत आहेत यात दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे पुण्यातून निवडणूक लढवण्याचा मोदींचा विचार आहे त्या अर्थी त्यांंना आत्ताच्या मतदारसंघातून पुन्हा निवडून येण्याची शक्यता कमी वाटत असले किंवा पुण्यातून त्यांना तेवढ्या लायकीचा उमेदवार भेटत नसावा. या दोन्हीतील नेमकं काय खरं हे मोदींनीच स्पष्ट केलं पाहिजे, असे सुषमा आंधारे म्हणाल्या.
‘डॉट असलेली आघाडी कधीच..,’; राहुल शेवाळेंनीही ‘इंडिया’ आघाडीला सोडलं नाही
मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाजपकडून टीका केली जातीय. यावर सुषमा आंधारे म्हणाल्या की टीका करणे हा त्यांच्या धर्म आहे. ते ज्या अर्थी टीका करत आहेत आणि उद्धव ठाकरेंना लक्ष करत आहेत, त्या अर्थी शिल्लकसेना म्हणून हिनवत असलेल्या शिवसेनेने त्यांना पाणी पाजले आहे. हे दाखवून दिले आहे की 40 लोक फोडले तरी त्यांना तुम्ही हारवू शकत नाही. त्यांचा पक्ष संपवू शकत नाही. हा पक्ष नेते पळवणारा पक्ष नाही. घडवलेल्या नेत्यांना पळवण्याचे काम भाजपा करते, याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांचे नेतृत्व कुचकामी आहे. ते एकही नेतृत्व घडू शकत नाहीत, असा हल्लाबोल सुषमा आंधारे यांनी केला.
Uday Samant : ‘कोणी कितीही आघाड्या केल्या तरीही मोदींना..,’; उदय सामंत ‘इंडिया’ आघाडीवर बरसले
इंडिया आघाडीच्या बैठकीतील खर्चावर शिंदे गटाकडून टीका केली जातीय. या टीकेला प्रत्युत्तर देताना सुषमा आंधारे म्हणाल्या की खर्चाबद्दल त्यांनी चिंता करु नये. इंडिया बैठकीचा खर्च करण्यासाठी 28 पक्ष एकत्र येऊन काम करत आहेत. पण ज्यावेळी 40 लोक एकत्र आले होते, त्यावेळी त्यांचा पक्षही अस्तित्वात आला नव्हता. त्यावेळी त्यांनी 10 कोटी कसे खर्च केले याचे उत्तर त्यांनी आधी द्यावे. इकडे 28 पक्ष आहेत यातील 13 मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आम्हाला खर्चाचे विचारण्याचे काही कारण नाही, अशी टीका सुषमा आंधारे यांनी केली.