Download App

Pimpri-Chinchwad : ‘ड्रीम 11’ वर टीम लावणं भोवलं; ‘करोडपती’ झालेले सोमनाथ झेंडे निलंबित

पुणे : ‘ड्रीम 11’ या ऑनलाईन बेटिंग अॅपवर दीड कोटी जिंकून चर्चेत आलेले पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे (Somnath Zende) यांचे निलंबन करण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीअंती वर्दीच्या वर्तणुकीला बाधा पोहचविल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मात्र विभागीय चौकशीत त्यांना स्वतःच म्हणणं मांडण्याची मुभा असणार आहे. (Suspension of Sub-Inspector Somnath Zende of Pimpri-Chinchwad Police Commissionerate, who won 1.5 crores on online betting app ‘Dream 11’)

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमनाथ झेंडे हे क्रिकेटचे चाहते आहेत. सध्या सुरु असलेल्या वर्ल्डकपमधील 10 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या इंग्लड विरुद्ध बांग्लादेश या सामन्यात त्यांनी ड्रीम इलेव्हन या ऑनलाईन बेटिंग अॅपवर टीम सिलेक्ट केली. त्यांनी सिलेक्ट केलेली टीम परफेक्ट बसली आणि त्यात ते तब्बल दीड कोटी रुपये जिंकले. यानंतर त्यांच्या खात्यात पैसेही येण्यास सुरुवात झाली. त्यांच्या या गोष्टीची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणी झेंडे चर्चेत आले.

मोठी बातमी! ड्रग्ज माफिया ललित पाटीलला चेन्नईतून अटक; मुंबई पोलिसांची कामगिरी

मात्र त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी तपासून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी स्पष्ट केले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनीच अंतर्गत चौकशी केली. यात झेंडे यांच्यावर वर्दीच्या वर्तणुकीला बाधा पोहचविल्याचा ठपका ठेवण्यात आला आणि त्यांचे निलंबन करण्यात आले.

ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून तरुण पिढी भरकटत चालली आहे. पैसे मिळवून देणाऱ्या ऑनलाइन गेम्सवर बंदी घालण्याची मागणीही केली जात असते. कारण, यामधून अनेकांची फसवणूक झाल्याचीही उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीत सरकारी नोकरीवर असलेल्या कर्मचाऱ्यानेच गेमिंगच्या माध्यमातूनच दीड कोटी कमावल्याने झेंडे यांच्यावर मोठी टीका झाली होती.

Lalit Patil Arrested : …अशी मुलं असण्यापेक्षा मेलेले बरे…’ ललित पाटीलच्या आई-वडीलांना अश्रु अनावर

दीड कोटी जिंकल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना सोमनाथ झेंडे म्हणाले होते, की मला क्रिकेट खेळायला आवडते. त्यामुळे मॅच बघत असताना टीव्हीवर या गेमबद्दल समजलं. त्यानंतर मी २-3 महिन्यांपासून हा गेम खेळत आहे. मागील काही दिवसांत मी सहा ते सात मॅच खेळलो. त्यानंतर हे बक्षीस मला मिळालं आहे, पण सुरुवातीला हे मला खरं वाटत नव्हतं. त्यानंतर चेक करुन पाहिल्यानंतर मला विश्वास बसला की आपल्या खात्यात खरंच पैसे आले आहेत. हा गेम जोखीमेचा आहे, अर्थिक जबाबदारी सांभाळून खेळला पाहिजे, किती खेळायचं, किती नाही ते आपल्यावर असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

Tags

follow us