Download App

थेट राज्य सचिवांना पत्र अन् पोलिसांवर गंभीर आरोप करत स्वारगेट प्रकरणातील पिडीतेची मोठी मागणी

Swargate case तील पिडीतेने राज्य सचिवांना पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये तीने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

Swargate case victim’s letter to State Secretary serious allegations on police : पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये (Pune Swarget Bus depo) बंद शिवनेरी बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाला होता. याप्रकरणी आरोपी दत्ता गाडे याला शिरुर तालुक्यातून अटक झाली होती. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. कारण आता या प्रकरणातील पिडीतेने राज्य सचिवांना पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये तीने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

काय आहे या पत्रात?

या पत्रात पिडितेने म्हटलं आहे की, आरोपी दत्ता गाडेने आपल्यावर दोनदा अत्याचार केले. त्यानंतर त्याला आपल्यावर अनैसर्गिक कृत्य करायचं होतं. मात्र आपण त्याला विरोध केला. तसेच प्रकरणाचा तपास करताना माझी संमती नसताना देखील पुरूष पोलिसांनी माझी चौकशी केली. त्यात मला वारंवार अत्याचार कसा झाला याची पुनरावृत्ती करावी लागली. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी माझी इच्छा नसताना वैद्यकिय चाचणी केली.

वाघ्याची अडचण आहे की, होळकरांनी निधी दिलाय याची? भूषणसिंह राजे होळकरांचा रोख कोणाकडे?

तसेच काही राजकीय नेत्यांनी माझ्या चारीत्र्यावर संशय व्यक्त करणारी तसेच आरोपीचं समर्थन करणारी वक्तव्य केली. त्याची तक्रार केली असता त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.तसेच पुढे या तरूणीने म्हटले की,या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिसांनी ही नियुक्ती आम्ही करू असं म्हटलं होतं. मात्र यात असीम सरोदे यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी तिने केली आहे. त्याचबरोबर या घटनेनंतर मी आरडाओरडा का केला नाही? अशी देखील चर्चा झाली. मात्र मी जीवाला घाबरून आरडाओरडा केला नाही. असं या पत्रामध्ये ही पिडीता म्हणाली आहे.

प्रकरण नेमकं काय?

मंगळवारी पहाटे 5.30 च्या सुमारास पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमधे अत्याचाराची घटना घडली. पीडित तरुणी पुण्याहून फलटण्याच्या दिशेने जात होती. बससाठी ती स्वारगेट बस स्थानकावर थांबली असता आरोपी दत्तात्रय गाडे तिकडे आला आणि पीडित तरुणीला स्वारगेट आगारात मधोमध उभी असलेली बस फलटणला जाणार आहे असं सांगितलं.

रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे 99’ मध्ये झळकणार ‘हे’ चेहरे

उभी असणारी बस सोलापुरला जाणार आहे आणि बस फलटणला थांबणार आहे. असं त्याने पिडितेला सांगितले. यावेळी तो पीडित तरुणीला ताई- ताई म्हणत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणी बस जवळ आली मात्र बस बंद असल्याने तू टॉर्च लावून आतमध्ये जा. हीच बस काही वेळात फलटणला निघेल असं आरोपीने तरुणीला सांगितलं. त्यानंतर तरुणी बसमध्ये चढली आणि तिच्या पाठीमागे बसमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे देखील चढला आणि बस बंद केली.

Tamannaah Bhatia : गुलाबी साडीत साडीत फुलून दिसतंय तमन्नाचं सौंदर्य…

तरुणी घाबरल्याने तिच्यासोबत घडलेला प्रकार कोणाला सांगितलं नाही. त्यानंतर फलटणला जाण्यासाठी तरुणी दुसऱ्या बसमध्ये बसली आणि तिने हा संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगितला. यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत तपास सुरू केला. शुक्रवारी मध्यरात्री शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून दत्तात्रय गाडेला ताब्यात घेण्यात आले. यानंतर न्यायालयात हजर केले असता त्याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

follow us