वाघ्याची अडचण आहे की, होळकरांनी निधी दिलाय याची? भूषणसिंह राजे होळकरांचा रोख कोणाकडे?

वाघ्याची अडचण आहे की, होळकरांनी निधी दिलाय याची? भूषणसिंह राजे होळकरांचा रोख कोणाकडे?

Bhushan Singh Raje Holkar On Waghya Dog Samadhi : राज्यात सध्या रायगड (Raigad) किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून (Waghya Dog Samadhi) वातावरण तापलेलं आहे. आरोप प्रत्यारोप देखील होत आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी ही समाधी हटवावी, अशी मागणी केलीय. त्यांनी मुख्यमंत्र्‍यांना पत्र दिलं होतं. त्यानंतर आता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी (Bhushan Singh Raje Holkar) वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या अस्तित्वावर बोलण्यास नकार दिलाय.

पत्रकार परिषदेत बोलताना भूषणसिंह राजे होळकर म्हणाले की, मागच्या दोन महिन्यात महाराष्ट्रात लोकांच्या प्रश्नांपेक्षा ऐतिहासिक मुद्द्यांवर भर देण्याचे काम सुरू आहे. यामुळे समाज एकमेकांविरोधात उभा राहत आहे. औरंगजेबाच्या समाधीचा विषय झाला, (Maharashtra Politics) आता ताजा परिस्थिती रायगड येथील वाघ्या कुत्र्याचा विषय. रायगड येथे असलेल्या वाघ्या कुत्र्याचा विषय हा कोणत्या एका जातीचा किंवा समाजाचा नाही. दुर्दैवाने महाराष्ट्रात प्रत्येक विषयाला जातीय वळण दिले जाते, असं देखील त्यांनी म्हटलंय.

Tamannaah Bhatia : गुलाबी साडीत साडीत फुलून दिसतंय तमन्नाचं सौंदर्य…

मी आमच्या घराण्याची भूमिका मांडण्यासाठी आलोय. शिवाजी महाराजांनी कर्तुत्वाच्या जोरावर माणसं निवडली होती. वाघ्या प्रकरण समोर आल्यानंतर सामाजिक सामाजिक तेढ निर्माण झाल्याचं समोर आलंय. वाघ्या कुत्र्याचं अस्तित्व होतं की नव्हतं, यावर मी काही बोलणार नाही. लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, म्हणून महाराष्ट्र शासन यांना मला विनंती करायची आहे. शासनाने पुढाकार घेऊन समिती नेमावी. दोन्ही बाजू ऐकून घ्याव्या. दोन्ही बाजूच्या इतिहासात अभ्यासाकांना समोरासमोर घेऊन बाजूला ऐकल्या पाहिजे. ती समिती काढता येते का, हे पहावं.

होळकरांनी रायगडावरील शिवसमाधीसाठी देणगी दिली. त्या स्मारकाबद्दल आमच्या भावाला आहेत. कुणाच्या भावना दुखावणार नाहीत, या दृष्टीने विचार व्हावा. होळकरांनी सर्व समाजासाठी काम केलं. सातारचे छत्रपती अजिंक्यतारावर बंधनात होते, तेव्हा होळकरांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. ह्या प्रकरणाला जातीय वळण न लावता मार्ग निघला पाहिजे. शिवसमाधीसाठी तुकोजी होळकर यांनी निधी दिला. त्यामुळे छत्रपती घराणं अस्तित्वात होतं, मात्र काय भूमिका घेतली? महात्मा फुले, टिळक, तुकोजी होळकर यांनी पुढाकार घेतला.

नेटवर्क स्लो असले तरी नो टेन्शन, पेमेंट होईल सेकंदात.. खास फीचर्ससह BHIM 3.0 लाँच

मुख्यमंत्र्यांनी सगळ्या संघटनांना समज द्यावी. तुकोजी राजे होळकरांनी अनेक विद्यापीठांना आणि शिवस्मारकांना निधी दिला. यामध्ये कोणाचा राजकीय हेतू असेल, तर माझा इशारा आहे कोणाचा अजेंडा चालू देणार नाही. 31 मे रोजी अहिल्याबाई होळकर यांची 300 जयंती आहे. यावेळी कोणत्याही गालबोट लागू नये, याची काळजी घ्यावी. तुकोजी महाराजांनी निधी दिलाय त्याच्या नोंदी आहेत. होळकरांनी स्वतःच्या कुत्र्याची समाधी रायगडावर का बांधली असती? या सगळ्या गोष्टी कथा आहेत ते इंग्रजांना घाबरत होते किंवा आणखी काही. वाघ्याची अडचण आहे की तुकोजी महाराज होळकर यांनी निधी दिला याची अडचण आहे असा देखील सवाल भूषणराजेंनी केलाय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube