Download App

Video : पुणे हादरलं! गजबजलेल्या स्वारगेट आगारात 26 वर्षीय तरूणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार

  • Written By: Last Updated:

पुणे : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे, शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरूणीवर बलात्कार (Rape) करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे.  स्वारगेट एसटी बस स्टँडमध्ये अभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. पहाटे अंधाराचा फायदा घेत नराधमाने महिलेवर बलात्कार केल्याचे सांगितले जात आहे. पीडित तरूणीला पुढील उपचारांसाठी ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Rape On 26 Years Girl In Swargate Bus Depo In Pune)

धक्कादायक! महिला वाहकाला डेपो मॅनेजरकडून शरीर सुखाची मागणी; पुण्यातील प्रकार

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित तरूणी पहाटे साडेपाचच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकात (Swargate Bus Stand) पुण्याहून फलटनकडे जाण्यासाठी आली होती. त्यावेळी संबंधित तरूणी फलाट क्रमांक 22 वर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये जाऊन बसली. त्यावेळी आरोपीने तरूणीला बाजूला उभी असलेली बस फलटनला जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पीडित तरूणी बाजूला उभ्या असलेल्या बसमध्ये जाऊन बसली. त्याचवेळी बसमधील लाईट बंद होते. याचाच फायदा घेत आरोपीने तरूणीवर अतिप्रसंग केला. सध्या पोलीस या नराधमाचा शोध घेत असून,पोलिसांनी आरोपीचे नाव निष्पन्न केले असून दत्तात्रय रामदास गाडे (रा. शिक्रापूर) असे या नराधमाचे नाव असून त्याच्याविरुद्ध जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जामीनावर बाहेर असल्याचे सांगितले जात आहे.

भाजपच्या राजकारणामुळे मारणेचा बळी?; नाव न घेता रवींद्र धंगेकरांनी सांगितल मोहोळांचं राजकीय गणित

नेमकं काय घडलं?

पुण्यात ही मुलगी काम करत आहे.फलटणला जात होती. सकाळी साडेपाच पावणेसहा दरम्यानची ही घटना असून, मुलगी बससाठी थांबली असताना आरोपी तिच्याकडे गेला होता. आरोपीने गोड बोलून या मुलीशी ओळख करून घेतली अन् कुठे जाते आहे असं विचारलं. त्यानंतर साताऱ्याची बस इथे लागत नसून दुसरीकडे लागत असल्याचं आरोपीने सांगितलं आणि तिला स्वतः सोबत नेलं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मुलगी त्या आरोपीसोबत जाताना दिसत आहे.

बसमध्ये अंधार असल्यामुळे तरुणीला संशय आला..गोड बोलून तरुणीला बसमध्ये चढायला सांगितलं त्यानंतर तरुणीवर अतिप्रसंग केला. हा सगळा प्रकार घडल्यानंतर ती मित्राशी बोलली आणि त्यानंतर तिने स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. आरोपीला शोधण्यासाठी आठ टीम तयार करण्यात आल्या आहेत. तरुणीची तब्येत नीट आहे आणि ती हे पोलिसांशी देखील व्यवस्थितरित्या बोलली आहे. या घटनेबाबत स्वारगेटच्या आगर प्रमुख असे आमचे काहीही बोलणं झालं नाही आधी आम्ही आरोपीची माहिती आणि तो कुठे प्रसार झाला याची माहिती घेत आहोत असल्याचे डीसीपी स्मार्तना पाटील यांनी सांगितले. हा सगळा प्रकार घडल्यानंतर बसून निघून गेली आणि निम्म्या रस्त्यात गेल्यानंतर तीने हा सगळा प्रकार मित्राला सांगितला.त्यानंतर स्वारगेट पोलीस ठाण्यात पीडितेने गुन्हा दाखल केला आहे.

भाजपला मीच छूप्या पद्धतीने नडू शकतो; पुण्यातील मिशन टायगर अडकलं अटी शर्तींच्या गर्तेत

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे महिलांसह सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यात नेहमी गजबजलेल्या स्वारगेट स्थानकात फलाटावर उभ्या असलेल्या बसमध्ये तरूणीवर बलात्कार झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीच्या शोधासाठी 12 पथकं रवाना करण्यात आली आहेत.

अशा घटना खपवून घेणार नाही – मोहोळ

घटलेल्या घटनेवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, स्वारगेट बस स्थानकात बलात्कार झाल्याची बातमी आता समजली त्यानंतर मी पोलीस आयुक्तांना फोन केला आणि लवकरात लवकर आरोपीला अटक करण्याच्या सूचना दिल्या अलून, माझ्या शहरात असा घटना खपवून घेणार नसल्याचेही मोहोळ यांनी म्हटले आहे.

follow us