Download App

धंगेकरांना भलताच आत्मविश्वास; संसदेत भाषणासाठी इंग्रजीचा क्लास ही लावणार

लेट्सअप मराठीसोबत बोलताना पुण्याचे लोकसभा उमेदवार आणि कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.

Ravindra Dhangekar Interview : पुण्यातील कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी पोट निवडणुकीत भाजपला मोठा धक्का देत विजय मिळवला. तसाच, लोकसभेलाही धक्का देणार असा आत्मविश्वास सध्या धंगेकर यांचा आहे. त्यांनी लेट्सअप मराठीच्या ‘लेट्सअप चर्चा’ या कार्यक्रमात आपणच विजयी होणार असा दावा केला आहे. धंगेकर संसदेमध्ये मराठी हिंदी कि इंग्लिशमध्ये बोलणार असं विचारलं असता धंगेकर म्हणाले, उस्मानाबादचे खासदार ओमराजे कस मराठीत सभागृह दणाणून सोडतात. आपणही मराठीतच बोलायच. मग पाहू हिंदी आणि जमलं तर इंग्लिश. तसंच, इंग्लिशचे क्लास लावणार का? असा प्रश्न करताच धंगेकर म्हणाले ते तर करावच लागणार असं म्हणत त्यांनी विजयाच विश्वास व्यक्त केला.

 

धंगेकरांचं खळबळजनक ट्विट! पबमधील फोटो शेअर करत म्हणाले, तासांच्या आत

चर्चा फक्त लीड किती

यावेळी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आहे. त्यामुळे आपल्या भाषेतचं आपण तिथं बोलणार अस सांगायलाही धंगेकर यावेळी विसरले नाहीत. तसंच, आमदारकीला लीड सांगत होतो. परंतु, खासदारकीला मला मोजता येईना आणि जनतेलाही सांगता येईना अशी परिस्थिती आहे. मात्र, लिडचा आकडा नाही सांगितला तरी मीच विजयी होणार असा विश्वासही आमदार रविंद्र धंगेकर यांनी व्यक्त केला. तसंच, मी आता  कसब्याचा नाही तर पुण्याचा खासदार आहे असा थेट दावाही धंगेकरांनी केला आहे. पुणेकरांची सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे लीड किती असंही ते यावेळी म्हणाले.

 

पहिल्याच फेरीपासून कळेल 

पुण्यात कोणता ट्रेंड चालला यावर धंगेकर म्हणाले फक्त रविंद्र धंगेकर हाच ट्रेंड चालला. तसंच, निकालावेळी पहिल्याचं फेरीत तुम्हाला कळेल की पुणेकर कुणाच्या बाजूने आहेत असं म्हणत खासदारकीला आपलाच विजय नक्की आहे असा विश्वास धंगेकर यांनी केला. तसंच, मी निवडणुकीनंतर निवांत होत नाही. सकाळपासूनच लोकांमध्ये असतो असंही ते म्हणाले.

 

जरांगे पाटलांनी नाही तर जानकरांनी जातीवाद केला; लेट्सअप चर्चेत जाधव थेटच बोलले

विजयाचा विश्वास

4 जुनला किती लीड असेल यावर सांगत नाही. कारण पहिल्या फेरीपासूनच लीड असणार आहे त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. कारण लोकांना विश्वास बसणार नाही की इतक कस मतदान झालं. त्यामुळे मी आत्ताच किती लीड असा कुठलाचं आकडा सांगणार नाही. परंतु, विजय आपलाच होणार असा दावा मात्र धंगेकरांनी कायम केला आहे. आता 4 जून रोजी पाहावं लागेल धंगेकरांचा हा आत्मविश्वास किती खरा ठरतो.

follow us