Bhor Assembly Constituency : भाजपचे भोर तालुका अध्यक्ष जीवन कोंडे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यांची भेट घेत भोर विधानसभेची जागा भाजपाला मिळावी अशी केली मागणी आहे. (Bhor) या मतदार संघात भाजप सरकारच्या काळात हजारो कोटींचा निधी खर्चून अनेक विकास कामं होत असल्याने, ही जागा भाजपाला मिळावी अशी केली विनंतीही त्यांनी केली आहे.
hit and run case: दोन दिवस अमित शाह अन् फडणवीसांसोबत होतो; पण दोघांकडेही मुलाचा विषय
जीवन कोंडे हे भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं समोर येत आहे. भोर विधानसभा मतदारसंघ गेली अनेक वर्ष काँग्रेसच्या ताब्यात आहे. येथे काँग्रेसचे संग्राम थोपटे हे विद्यमान आमदार आहेत. थोपटेंच्या विरोधात लढण्यासाठी महायुतीकडून भाजपचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि शिवसेनेचा 1 जण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
मोठी बातमी : केजरीवालांचा तुरूंगवास संपला; CBI प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर
भाजपकडून जीवन कोंडे, किरण दगडे.. राष्ट्रवादीकडून रणजित शिवतरे, विक्रम खुटवड.. तर शिवसेनेकडून कुलदीप कोंडे इच्छुक आहेत.. मात्र आता भाजपच्या तालुका अध्यक्षांनी थेट देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत, त्यांना मागणीचं पत्र देत भोर विधानसभा मतदार संघावर दावा केलाय. त्यामुळे नक्की इथ महायुतीकडून कोण असणार? आणि हा पेच महायुती कसा सोडवणार हे पाहण महत्वाचं आहे.