Download App

आळंदीतील माऊली मंदिर परिसरात तणाव.. पोलीस-वारकऱ्यांमध्ये झटापट…

  • Written By: Last Updated:

विष्णू सानप : लेट्सअप मराठी

Ashadhi Wari : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी सोहळ्यासाठी राज्यासह इतर राज्यातून लाखों भाविकांचा महामेळा आळंदीत जमला आहे. आज सायंकाळी चार वाजता माउलींच्या पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. यादरम्यान पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक आणि झटापट झाली.

वारकरी मंदिर प्रवेश करण्यासाठी आग्रही होते. यामध्ये पोलिसांनी वारकऱ्यांमध्ये आधी शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर वारकऱ्यांनी पोलीस बंदोबस्तातील कर्मचाऱ्यांना आणि बॅरिकेट्सना लोटून देत मंदिर प्रवेशासाठी पुढे सरकले मात्र पोलिसांनी त्यांना अडवले असता त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला आणि यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला. यानंतर थोड्या वेळात प्रकरण शांत करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला मात्र हजारोच्या संख्येने असलेले वारकरी मात्र चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान काही वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या असल्याची माहिती मिळते आहे.

Monsoon 2023 Update: आला रे आला, अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल!

47 दिंड्यांना मंदिरात प्रवेश आहे. प्रत्येक दिंडीतील 75 वारकऱ्यांना त्यात प्रातिनिधिक स्वरूपात प्रवेश दिला जातो. पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये झटापट झाल्याने मंदिराच्या बाहेर मोठा बंदोबस्त तैनात आहे. ज्या वारकऱ्यांना प्रवेश दिला नाही त्या वारकऱ्यांनी प्रवेश देण्याचा आग्रह केल्याने पोलीस आणि वारकऱ्यांच्या झटपट झाली, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या झटापाटीमुळे मंदिर परिसरामध्ये तणावाचं वातावरण असून पोलिसांनी अधिक बंदोबस्त वाढवला आहे.

Tags

follow us