Monsoon 2023 Update: आला रे आला, अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल!

  • Written By: Published:
Monsoon 2023 Update: आला रे आला, अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल!

Monsoon In Maharashtra : मान्सूनची (Monsoon 2023) आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल (Monsoon In Maharashtra) झाला आहे. भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाल्याची माहिती दिली आहे. जवळपास एक आठवडा उशीराने मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे. मान्सूनच्या आगमनामुळे महाराष्ट्रातील जनतेसोबतच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. (monsoon-2023-update-monsoon-finally-arrival-in-maharashtra)

11 Jun,आज राज्यात द.कोकणात व द.म. महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. राज्यात पुढच्या 4,5 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची (Thunderstorms with gusty winds & rains) शक्यता अनेक ठिकाणी आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘नैऋत्य मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये काल पासून पावसाला सुरूवात झाली. दरवर्षी मान्सून 7 जूनच्या आसपास महाराष्ट्रामध्ये दाखल होत असतो. पण यावर्षी मान्सूनचे आगमन होण्यासाठी तब्बल एक आठड्याचा उशीर झाला आहे. मान्सूनने महाराष्ट्रामध्ये दाखल होण्यासाठी 11 जूनची तारीख गाठली. आता हळूहळू मान्सून पुढे सरकरत संपूर्ण राज्यात सक्रीय होईल.

कार्यकारी अध्यक्ष झाल्यानंतर सुप्रिया सुळे कोणाला रिपोर्टिंग करणार? थेट दिले उत्तर

मान्सून आज राज्यात दाखल झाला असून तो लवकरच उर्वरित राज्यात दाखल होईल. मान्सून येत्या 3 ते 4 दिवसात संपूर्ण राज्यात सक्रिय होईल. अंदाजे 16 जून पर्यंत संपूर्ण राज्यात मान्सून बरसेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सूनच्या आगमनामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच राज्यातील शेतकरीदेखील आनंदी झाला आहे.

दरम्यान, यावर्षी बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास लांबला. या चक्रीवादळाच्या परिणामामुळेच मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी उशीर होत असल्याचे हवामान खात्याने सांगितले होते. आता मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube