Tesla Office In Pune : पुण्यात पिकतं ते जगभर खपतं असे म्हटले जाते. पुण्यातल्या प्रत्येक गोष्टीची सर्वदूर चर्चा केली जाते. नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यादरम्यान संपूर्ण देशाच्या नजरा पुण्यावर खिळल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा पुणे शहर चर्चेत आले आहे. यावेळी कारण ठरले आहे ते ट्विटरचा मालक एलॉन मस्क. गेल्या अनेक दिवसांपासून टेस्ला कंपनी भारतात येणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर यावर शिक्कामोर्तब झाले असून, टेस्लाचे पहिले कार्यालय पुण्यात सुरू होणार आहे. यासाठी जागाही निश्चित झाली आहे.
कुठे असणार कार्यालय?
एलॉन मस्कच्या टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडने पुण्यातील विमान नगर येथे कार्यालय असणार आहे. कंपनीने पंचशील बिझनेस पार्क येथे कार्यालयासाठी जागा निश्चित केली असून, त्याबाबतचा भाडे करारही करण्यात आला आहे.
भले मोठे असणार कार्यालय
टेस्लाच्या भारतीय उपकंपनीने पंचशील बिझनेस पार्क येथील बी विंगच्या पहिल्या मजल्यावर 5,580 चौरस फूट ऑफिस स्पेससाठी भाडेतत्त्वावर घेतली आहे. त्यासाठी टेबलस्पेस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडसोबत पाच वर्षांच्या करार करण्यात आला आहे.
Nitin Desai : एन.डी. स्टुडिओ उभारण्यास कारण ठरला होता हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पीट…
भाड्यासाठी मोजणार लाखोंची रक्कम
रिअल इस्टेट अॅनालिटिक्स फर्म CRE मॅट्रिक्सने शेअरच्या कागदपत्रांनुसार कार्यालयासाठी टेस्ला कंपनी दरमहा 11.65 लाख रुपये भाडे मोजणार आहे. तर अनामत सुरक्षा ठेवीसाठी कंपनीने 34.95 लाख रुपयांची रक्कम दिली आहे. ज्या ठिकाणी टेस्लाचे कार्यालय सुरू होणार आहे ते पंचशील बिझनेस पार्क सध्या बांधकामाधीन असून, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे.
दहशतवाद्यांकडून ब्रेन वॉश कसं केलं जातं? ऐका!
जूनमध्ये मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिका दौऱ्यादरम्यान भेट घेतली होती. त्यात मस्कने टेस्ला भारतात EV कार उत्पादनास इच्छूक असल्याची भावना व्यक्त केली होती. याशिवाय टेस्लाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात इन्व्हेस्ट इंडियाच्या अधिका-यांची भेट घेतली होती तसेच आगमी काळात दिल्लीत अन्य काही बैठका आयोजित केल्या आहेत.