Download App

शिवसेनेतील ‘त्या’ युवा नेत्याला एकनाथ शिंदेंच्या कार्यालय अन् निवासस्थानाबाहेर फिरण्यास बंदी, कारण…

Eknath Shinde  :  पुण्यातील शिवसेनेच्या (शिंदे) एका युवा नेत्याला शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)

  • Written By: Last Updated:

Eknath Shinde  :  पुण्यातील शिवसेनेच्या (शिंदे) एका युवा नेत्याला शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे कार्यालय आणि निवासस्थानी नो एन्ट्री करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे पुणे (Pune) दौऱ्यावर असल्यावर त्यांच्या गाडीच सारथ्य याच युवा नेत्याने केलं होतं. मात्र आता याच युवा नेत्याला शिंदे यांच्या कार्यालयाकडून कडक शब्दात सुनावण्यात आलं असल्याचे वृत्त पुण्यनगरीने दिले आहे.

हा नेता शिवसेनेच्या (Shiv Sena) अंतर्गत असलेल्या एका उपशाखेच नेतृत्व करतो. मुख्यमंत्री असताना शिंदे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यावर सुरक्षा भेदून तथा ज्येष्ठ नेत्यांना डावलून शिंदेंच्या गाडीचे स्टेरिंग आपल्या हाती घेत होता. याबाबत शिंदेंच्या कानावर अनेकदा तक्रारी गेल्यानंतरही एक शिवसैनिक म्हणून शिंदेंनी देखील याकडे कानाडोळा केला. मात्र या युवा नेत्याचे इतर उद्योग लक्षात आल्यानंतर कडक शब्दात सुनावण्यात आलं आहे.

या युवा नेत्याचा पराक्रम असा की, मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्यासोबत सेल्फी आणि निवासस्थानी घेऊन जाण्यासाठी आर्थिक व्यवहार करत होता. या गोष्टी एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचल्याने शिंदे यांचे कार्यालय आणि निवासस्थानावर या नेत्याला नो एन्ट्री करण्यात आली. शिवसेना नेत्यानांही याबाबत माहिती देण्यात आली आहे. यामुळे या नेत्याचं झोल-झाल करण्याच दुकान बंद झाल्याच्या चर्चा आता रंगत आहेत.

दरम्यान, सीएमओ कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत शहरातील नामांकित महाविद्यालयामध्ये फोन करत विद्यार्थ्यांचे ऍडमिशन करून द्या, अशा धमक्या देऊन लाखोंची कमाई करणाऱ्या टोळी विरोधात पिंपरीत गुन्हा दाखल आहे.

RBI चे नवे बॉस संजय मल्होत्रा यांच्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही

या टोळीचा मास्टरमाइंड म्हणून देखील या नेत्याचं नाव होतं मात्र ते पद्धतशीरपणे वगळण्यात आल्याच्याही चर्चा आहेत. झालेल्या या इनसाईड गोष्टीमुळे हा नेता कमालीचा अस्वस्थ झाला आहे. यामुळे तो पुढील काळात शिवसेनेसोबतच राहतो की वेगळा विचार करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us