Download App

कसब्यातील पराभवाचा राग ब्राह्मण समाजावर! हिंदू महासंघाचा भाजपवर आरोप

  • Written By: Last Updated:

काल राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्व समाजासाठी काही ना काही घोषणा केली आहे. पण ब्राह्मण समाजासाठी काहीच घोषणा केली नाही. त्यामुळे ज्य सरकारने कसबाचा राग ब्राह्मण समाजावर काढला आहे का? अशी टीका हिंदू महासभेचे नेते आनंद दवे यांनी केली आहे. आनंद दवे यांनी कसबा पोटनिवडणुकीत अपक्ष निवडणूकही लढवली होती पण त्यांना फारच कमी मते मिळाली होती.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये त्यांनी काही नव्या महामंडळाची घोषणा केली. त्यामध्ये त्यांनी ब्राह्मण समाजच्या महामंडळाची घोषणा केली नाही. त्यावरून दवे यांनी सरकारवर टीका केली.

हेही वाचा : Bhaskar Jadhav : आज माझ्यावर राग कमी दिसतोय; नार्वेकरांना उद्देशून जाधवांचे विधान

याविषयावर पुण्यात एका वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये ते म्हणाले की अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक समाजाला काही ना काही दिले, पण ब्राह्मण समाजासाठी मात्र परशुराम विकास महामंडळ दिले नाही. ते पुढे म्हणाले की, यावर स्पष्टीकरण म्हणून असे सांगण्यात आले आहे कि सरकारने ब्राह्मण समाजाला अमृत योजना दिली. पण अमृत योजना पण ती सर्वच खुल्या प्रवर्गसाठी आहे, त्यामुळे त्यात सर्वच लोक दावा सांगणार.

कोणत्या समाजासाठी महामंडळाची घोषणा ?

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये त्यांनी नव्या महामंडळाची घोषणा केली आहे. त्याची यादी खालीलप्रमाणे

लिंगायत समाजासाठी बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ : निधी 50 कोटी,

गुरव समाजासाठी काशीबा गुरव विकास महामंडळ: निधी 50 कोटी,

रामोशी समाजासाठी उमाजी नाईक महामंडळ: निधी 50 कोटी,

वडार समाजासाठी मारुती चव्हाण महामंडळ: निधी 50 कोटी रुपये

 

Tags

follow us