Download App

भीमाशंकर डोंगरात बस वीस फूट दरीत कोसळली, मोठी दुर्घटना टळली, सर्व प्रवासी सुखरूप

  • Written By: Last Updated:

आंबेगाव तालुक्यात गिरवली येथे वळणावर एसटी गाडी पुलावरून तब्बल वीस फूट खाली कोसळली. ही गाडी भीमाशंकरकडून कल्याणच्या दिशेने जात होती. गाडीत वाहक चालकांचे एकूण 37 प्रवासी होते. सर्वांना किरकोळ दुखापत झाली आहे. तर दोघांना गंभीर दुखापत झाली आहे त्यांच्यावर घोडेगावात उपचार सुरु आहेत.

अपघात गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस स्टेशन जीवन माने गिरवली चे सरपंच संतोष सैद व ग्रामस्थांमुळेमदत कार्य ताबडतोब मिळाल्याने व गिरवलीच्या ग्रामस्थांनी मदत केल्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. ( The bus fell into a twenty feet valley in Bhimashankar mountain, a major accident was avoided, all the passengers were safe.)

दरम्यान आंबेगाव चे लोकप्रतिनिधी तथा कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ताबडतोब या कामी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या त्यामुळे मोठ्या संख्येने रुग्णवाहिका घटनास्थळी आल्या घोडेगाव ग्रामीण रुग्णालय प्रमाणेच मंचर उपजिल्हा रुग्णालयातही डॉक्टरांचे पथक कार्यरत केले होते. गिरवली जवळ नेहमीच अपघात होतात त्यासाठी धोकादायक वळण काढून टाकावे अशी मागणी सरपंच संतोष सहित यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांना सकाळीच मोबाईलवर संपर्क साधून केली आहे. त्यानुसार वळसे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला सूचना दिल्या आहेत लवकरच हे वळण काढण्याविषयी कार्यवाही होईल असा विश्वास संतोष सईदयांनी व्यक्त केला.

सप्तशृंगी गड घाटात भीषण अपघात; बस थेट 400 फूट दरीत कोसळली

दरम्यान रस्त्याने पाऊस पडत होता त्यामुळे गाडी स्लिप झाल्याचे एसटीचे चालक एस एच शेख यांनी घोडेगाव पोलिसांना सांगितले आहे. घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जीवन माने पुढील तपास करत आहेत. जखमी मध्ये 14 महिला काही लहान मुले ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश आहे.

Tags

follow us