Download App

पुण्यात विविहितेंच्या आत्महत्येचे सत्र सुरूच; सासरच्या जाचाला कंटाळलेल्या महिलेने केले विषप्राशन

The cycle of suicides continues in Pune; A woman, fed up with her in-laws’ harassment, consumed poison : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यात महिलांच्या घरगुती हिंसाचाराच्या घटनांचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यातच हाय प्रोफाईल केस असलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच पुण्यात पुन्हा एका विवाहितेने हुंड्याच्या त्रासाला कंटाळून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

पुण्यातील लोहगाव भागात 23 वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. ज्यामध्ये तिने सांगितल्या नुसार फिर्यादी आणि यांचे पती अजय पवार, सासू कमल पवार आणि दीर मनोज पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात झालं असं की, फिर्यादी महिलेला तिचा पती अजय पवार यांनी सुद्धा फिर्यादी यांना “मी तुझ्याशी टाईमपास केला, आता तू मेली तरी चालेल. मला पैशाची गरज आहे मला चारचाकी गाडी घेवून देण्यास सांग तुझ्या बापाला,” असं म्हणाल्यावर फिर्यादी यांनी त्याला नकार दिला. असं म्हणताच पती ने पत्नीचा गळा दाबून त्यांना पुन्हा मारहाण केली. फिर्यादी यांचे दीर मनोज पवार यांनी सुद्धा त्यांना शिवीगाळ केल्याची तक्रार त्यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून महाराष्ट्रात दाखल, तब्बल १२ दिवस आधीच ‘कोसळधारा’

21 मे रोजी फिर्यादी यांची सासू यांनी, “पहिल्या सुनेलाही घराबाहेर काढले तसेच तुलाही बाहेर काढीन,” अशी धमकी दिली तसेच “तू पांढऱ्या पायाची आहेस तुझी नजर चांगली नाही तु घरात आल्यापासून शांतता नाही,” असं हिणवलं. हा त्रास सहन न झाल्याने फिर्यादी यांनी रागाच्या भरात झुरळ मारण्याचे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. फिर्यादी यांची तब्येत आता बरी असून त्यांनी स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे.

प्राइम व्हिडिओने केली सर्वात मोठ्या भारतीय रिअॅलिटी शोची घोषणा, द ट्रेटर्सचं सुत्रसंचालन करणार करण जौहर

फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती अजय यांच्याशी 22 मे 2022 मध्ये लग्न झालं होत. लग्नाच्या ६ महिन्यानंतर अजय पवार यांनी घरगुती कारणावरून फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. यानंतर फिर्यादी यांची सासू कमल पवार ने फिर्यादी यांना “तु माहेरावरुन काय आणले आहेस तुझ्या आई बापाला काही मिळत नाही, तुमची काही लायकी नाही” असं म्हणाली.

follow us