Download App

डान्स करतानाचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल, नीलम गोऱ्हेंनी दिले सखोल चौकशीचे आदेश

Bhandara Viral Video : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातल्या नाका डोंगरी भागामध्ये आणि मोहाडी तालुक्यातल्या बीडमध्ये 17 नोव्हेंबर रोजी डान्स हंगामा कार्यक्रमात तरुणीने विवस्त्र डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल (Bhandara Viral Video) झाला होता. या घटनेवर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी चिंता व्यक्त करत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

सांस्कृतिक कलाक्षेत्रामध्ये संगीत व नृत्य हा अविभाज्य घटक आहे. परंतु ज्या प्रकारे याचे व्यापारीकरण होऊन नाचताना स्त्रियांना विवस्त्र होण्यासाठी भाग पाडणे आणि मग पैसे उधळले जाणं हा निंदनीय प्रकार आहे. ही केवळ एक घटना नसून तो गंभीर गुन्हा असल्याचे मत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

यासंदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षक छरिंग दोरजे यांच्याशी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दूरध्वनीद्वारे सविस्तर चर्चा केली. त्यांनी म्हटले की महिलेला विवस्त्र होण्यासाठी भाग पाडणे हा गुन्हा आहे. तसेच रात्रीच्या वेळेला अशा प्रकारे लोकांची गर्दीमध्ये स्त्रियांना विवस्त्र करून त्यांचेवर नोटा उधळल्या जातात. यामुळे त्यांनी अश्लील हावभाव करत नाचावं हा दुष्ट हेतू आहे. यामध्ये राजकीय नेते सुद्धा आहेत. हे अत्यंत निषेधार्थ आणि चिड आणणारी घटना आहे.

अजित पवारांनी शब्द पाळला नाही, 1 जानेवारीनंतर जाब विचारणार; विजयस्तंभ समितीचा इशारा

त्यामुळे यामध्ये कडक कारवाई होणे आवश्यक आहे. या प्रकारच्या नृत्य करणाऱ्या स्त्रियांना नृत्य करताना विवस्त्र करून नाचवता कामा नये. अशा लेखी सूचना त्यांना बंधनकारक करणे आवश्यक आहे. यामध्ये पोलिसांनी एक व्यवस्थित नियमावली तयार करावी. अशा सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक दोरजे यांना केल्या आहेत.

Mla Disqualification : ‘विधानसभा अध्यक्षांनी खुर्चीचं पावित्रं राखावं’; नाना पटोलेंचा नार्वेकरांना सल्ला

ज्यावेळी डान्सबार विरोधी कायदा झाला. त्या कायद्यामध्ये अनेक बंधन घालण्यात आली होती. सामान्य लोकांचा सहभाग ज्या कार्यक्रमात असतो, त्यावेळेस अशा पद्धतीने लोकांनी महिलांना मजबूर करून त्यांचं लैंगिक शोषण करणे किंवा त्यासारखं गुन्हे करणं हे अत्यंत चिड आणणारी घटना आहे. तसेच या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा सामाजिक भान आणि कायद्याची बुज राखली गेली पाहिजे असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले.

Tags

follow us