Download App

भुजबळांमधील शिवसैनिक आजही जागा; शिंदे गटाला सांगितली ‘हिंदुत्वा’ची व्याख्या

  • Written By: Last Updated:

चिंचवड : चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. प्रत्येक पक्षाकडून आपापलाच उमेदवार निवडून येईल अशी खात्री बाळगली जात आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या न्यायालयीन लढाईवरून आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेबरोबरच भाजपवरही जोरदार हल्लाबोल चढविला जात आहे. काल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाना काटे (Nana Kate) यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी तलेट्सअप मराठीशी संवाद साधतांना त्यांनी भाजपसह शिवसेनेच्या नेत्यांवरही जोरदार टीका केली.

हिंदुत्वासाठी आम्ही बाहेर पडलो, असं शिंदे गटाकडून वारंवार सांगितल जात आहे. यावर बोलतांना भुजबळ म्हणाले, हिंदुत्वासाठी शिवसेना संपवून टाकायची, हा कुठला न्याय आहे. शिवसेना हिंदुत्वाच्या विरोधात होती काय? खुद्द बाळासाहेबांनीही सांगितलं की, आमचं हिंदुत्व हे देवळात घंटा बडवणाऱ्याचं हिंदुत्व नाही, ते सर्वसामान्याच्या हिताचं हिंदुत्व आहे. मात्र, शिंदे गटाकडून बाळासाहेंबाची शिवसेनाच संपवल्याचं कटकारस्थान शिंदेगटाकडून झालं, अशी टीका भुजबळांनी केली.

 

उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर अद्याप अंतिम निर्णय येणे बाकी असताना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल देत ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ शिंदे गटाला दिले. यावर प्रतिक्रिया देतांना भुजबळ यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

ते म्हणाले, ठाकरेंकडून पक्ष चिन्ह गेलं, पक्षाचं नाव गेलं. मात्र, हे असं होणारच आहे, याची मला कल्पना होती. उद्धव ठाकरेंनाही याची कल्पना होती. त्यामुळेच त्यांनी सांगितलं होतं की, सुप्रीम कोर्टाचा निकला येत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाने निकला देऊ नये. मात्र, निवडणूक आयोगावर दबाव असल्यानं त्यांनी शिंदे गटाच्या बाजूने हा निर्णय दिला, अशी टीका भुजबळांनी केली.

दरम्यान, भुजबळ म्हणाले की, निकाल जरी शिंदे गटाच्या बाजूने लागला असला तरी खरी शिवसेना कोणाची आहे? हे आगामी विधानसभा निवडणुकीत कळेल. ठाकरे आणि शिवसेना हे एक अतुट समीकरण आहे. उद्धव यांच्यासोबत ठाकरे हे नाव आहे. शेवटी पक्षाचा नेता कोण आहे, हे लोकांना जास्त महत्वाचं असतं.

Salman Khan : सलमानचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते झाले उदास

गेल्या चार दिवसांत अनेक राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या, त्यावर बोलतांना भुजबळ म्हणाले की, धमक्या आल्या, असा या नेत्यांनी सांगतिलं. ते नेते खोटं सांगणार नाही. राजकीय नेत्यांना धमक्या येत असतांना राज्य सरकारचं इंटेलिजन्स करतं काय? असा सवाल भुजबळ यांनी केला. ते म्हणाले, काल ठाकरे गटाच्या सचिन भोसलेंना मारहाण झाली. आपल्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली, असा दावा त्यांनी केला. मात्र, त्यावर अद्याप काही कारवाई झाली नाही. भाजपच्या कार्यकर्यांना अटक तरी कशी होऊ होणार? त्यांनी काहीही केलं तरी त्यांना सगळं क्षम्य असतं, अशी उपरोधिक टिप्पणी भुजबळ यांनी केली. मात्र, या सगळ्याचा बदला मतदार नाना काटेंना निवडून घेतील, असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला.

Tags

follow us