निलेश घायवळ प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. (Pune) निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद् करण्यात आला आहे. पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून याबाबतची ऑर्डर जारी झाली आहे. पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयात तसेच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात घायवळ बाबत अहवाल सादर केला होता. पासपोर्ट रद्द झाल्याने निलेश घायवळच्या अडचणी वाढल्या आहेत.
पुण्यातील कोथरूडमधील गोळीबारानंतर कुख्यात गुंड निलेश घायवळ चर्चेत आला होता, त्यावेळी तपासामध्ये समोर आलं की पोलिसांना चकवा देत घायवळ परदेशात पळून गेला. विशेष म्हणजे त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असताना त्याला पासपोर्ट कसा मिळाला याविषयी पोलिस प्रशासनावरच ताशेरे ओढले जात होते. घायवळने पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये अहिल्यानगरमधील आपल्या गावाच्या पत्तावर त्याने पासपोर्ट काढला. विशेष म्हणजे पासपोर्टसाठी त्याने आपल्या आडनावात देखील बदल केला.
घायवळ ऐवजी गायवळ नावाची कागदपत्रे त्याने सादर केली. आता त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. गायवळ नावावर कोणतेही गुन्हेगारी कृत्य नोंद नसल्याने पोलिसांनी त्याला एनओसी दिले. तसेच पासपोर्ट ऑफीसला आपल्यावर गुन्हा दाखल नसल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र देखील त्याने दिले होते. यामुळे त्याला पासपोर्ट मिळाला. मात्र, परदेशात पळून गेलेल्या घायवळचा पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. निलेश घायवळ याने पासपोर्टसाठी खोटी कागदपत्रे तयार केली. पोलिस रिकोर्डमध्ये त्याचे नाव निलेश घायवळ आहे. त्यामुळे पासपोर्ट काढण्यासाठी त्याने निलेश गायवळ नावाने आधारकार्ड काढले.
घायवळ आणि भाजपची मिडिया! रविंद्र धंगेकरांचा हल्लाबोल, पत्रकार परिषदेत थेट नावंचं घेतले…
गायवळ नावाचे गुन्हेगारी रेकाॅर्ड नसल्याने पासपोर्ट काढणे त्याला शक्य झाले. तसेच पोलिसांना देखील ऑनलाईन यंत्रणेत गायवळच्या नावावर गुन्हे दाखलची माहिती मिळाली नाही. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घायवळची बँक खाती गोठवण्यात आली होती. कोथरूड गोळीबार प्रकरणात ‘मकोका’ कारवाई केल्यानंतर परदेशात पसार झालेला गुंड निलेश घायवळचे पासपोर्ट रद्द करण्यात येणार आहे,’ अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी काल (शुक्रवारी, ३) दिली. घायवळने बनावट कागदपत्रे, माहितीच्या आधारे पासपोर्ट मिळविल्याचे तपासात उघड झाले आहे.
पुण्यातील प्रादेशिक पासपोर्ट विभागातील अधिकाऱ्यांनी (शुक्रवारी, ३) पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणी चर्चा केली. कोथरूड गोळीबार प्रकरणात घायवळ परदेशात पसार झाला. घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी ‘गायवळ’ असे नाव असलेली कागदपत्रे सादर केली. ही कागदपत्रे अहिल्यानगर पोलिसांकडे सादर करून त्याने तत्काळ पासपोर्ट मिळवला असल्याची माहिती आहे. पुण्यातील कोथरूड परिसरातील गोळीबार प्रकरणात घायवळसह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली. पण, घायवळ ११ सप्टेंबरपासून परदेशात असल्याची माहिती मिळाली आहे, यापूर्वी घायवळविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्यात आली होती.
त्या वेळी न्यायालयाने त्याला काही अटी आणि, शर्तींवर जामीन मंजूर केला होता. त्या वेळी घायवळला पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. घायवळने परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट कसा मिळवला, याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. पासपोर्ट काढताना त्याने ‘घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ असे नाव असलेली कागदपत्रे सादर केली. त्याने अहिल्यानगरमधील पत्त्याचा वापरून पासपोर्ट काढला, पुणे पोलिसांनी तेथे त्याने दिलेल्या त्या आहिल्यानगरच्या पत्त्यावर छापा टाकला. मात्र, पासपोर्ट मिळविण्यासाठी दिलेला पत्ता खोटा असल्याचे उघडकीस आले, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.घायवळने पासपोर्टसाठी अर्ज करताना प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्या प्रतिज्ञापत्रात त्याने स्वतःविरुद्ध राज्यात किंवा इतर कोणत्याही परराज्यात कोणताही गुन्हा नोंदलेला नाही, असा दावा केला होता.