दर 4-5 वर्षांनी सेवेची संधी द्या म्हणणारे पुढे गायब; मोहन भागवतांनी घेतला राजकीय नेत्यांचा समाचार

पुणे : दर चार-पाच वर्षांनी सेवेची संधी द्या म्हणणारे येतात. पुढे महिन्यानंतर गायब होतात. पुन्हा पाच वर्षांनी सेवेची संधी द्या म्हणत येतात, अशा शब्दात सरसंघसंचालक मोहन भागवत ( Mohan Bhagwat)यांनी राजकीय नेत्यांचा समाचार घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांच्या सांगता वर्षांनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, जनकल्याण सेवा फाउंडेशन आणि डॉ. हेडगेवार […]

Untitled Design (64)

Untitled Design (64)

पुणे : दर चार-पाच वर्षांनी सेवेची संधी द्या म्हणणारे येतात. पुढे महिन्यानंतर गायब होतात. पुन्हा पाच वर्षांनी सेवेची संधी द्या म्हणत येतात, अशा शब्दात सरसंघसंचालक मोहन भागवत ( Mohan Bhagwat)यांनी राजकीय नेत्यांचा समाचार घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांच्या सांगता वर्षांनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, जनकल्याण सेवा फाउंडेशन आणि डॉ. हेडगेवार स्मारक सेवा निधी या संस्थांनी मिळून उभारलेल्या सेवा भवन या प्रकल्पाचे उद्घाटन मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते

यावेळी भागवत यांनी धर्माचा अर्थ उलगडून सांगितला आहे. धर्म म्हणजे पूजा नव्हे धर्म म्हणजे कर्तव्य आहे. माणुसकीचा धर्म सेवा हाच आहे, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, लोकशाही देशांमध्ये दर पाच वर्षांनी सेवाबाधितांची संख्या एकदम उभी ठाकते. सेवेची बाधा झालेले लोक घरोघरी नमस्कार करून सेवेची संधी देण्याची मागणी करतात. त्यानंतर एका महिनाभरात ही साथ ओसरून जाते. मग हे सेवाबाधित कुठे आहेत, याचे उत्तर पुन्हा पाच वर्षांनी मिळते. दर चार-पाच वर्षांनी सेवेची संधी द्या म्हणणारे येतात. पुढे महिन्यानंतर गायब होतात. पुन्हा पाच वर्षांनी सेवेची संधी द्या म्हणत येतात, अशा शब्दात त्यांनी राजकीय नेत्यांवर टोलेबाजी केली.

दर 4-5 वर्षांनी सेवेची संधी द्या म्हणणारे पुढे गायब; मोहन भागवतांनी घेतला राजकीय नेत्यांचा समाचार

धर्म म्हणजे केवळ पूजा नव्हे, तर कर्तव्य आणि स्वभाव आहे. सेवा हाच खरा माणुसकीचा धर्म आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Exit mobile version