Horoscope Today 5 March 2023 : ‘या’ राशींना अचानक होऊ शकतो धनलाभ; वाचा आजचे राशी भविष्य

Horoscope Today 5 March 2023 : ‘या’ राशींना अचानक होऊ शकतो धनलाभ; वाचा आजचे राशी भविष्य

Horoscope Today 5 March 2023 : आजचे राशीभविष्य: 5  मार्च 2023,रविवार, चंद्र सकाळी 8.58 वाजता मिथुन राशीनंतर कर्क राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत आज संपूर्ण दिवस चंद्र स्वतःच्या राशीत असेल. तर आज बुध शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल. पुनर्वसु नक्षत्राचा प्रभाव दिवसभर राहील. यासोबतच आज शुभ योगही असतील.

मेष : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रवास सुखकर होतील.

वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल.

31 मार्चनंतर विना हॉलमार्क सोनं विकण्यास मनाई, नकली सोनं विक्रीला बसणार चाप

कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

सिंह : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कन्या : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

तूळ : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

वृश्चिक : वाहने जपून चालवावीत. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

धनू : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. शत्रुपीडा नाही.

डोळ्यांखालील काळी वर्तुळे होतील दूर… जाणून घ्या उपाय

मकर : शासकीय कामे पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कुंभ : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल.

मीन : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube