Download App

पुण्यनगरीत आज पालख्या दाखल होणार; वाहतुकीत मोठे बदल, या पर्यायी मार्गांचा करा वापर

आज संत श्री तुकाराम महाराज व संत श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखींचं पुण्यात आगमन होणार आहे. त्या पार्श्वभूमिव पुण्यात वाहतूक बदल केले आहेत.

  • Written By: Last Updated:

Pune Traffic Update : पुणे शहरामध्ये आज संत श्री तुकाराम महाराज व संत श्री. ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखींचं आगमन होणार आहे. या अनुषंगाने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालखी मार्ग व त्या परिसरातील वाहतूकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पिंपरी चिंचवड येथून रविवारी दुपारनंतर पुण्यात दाखल होणार आहे. (Pune Traffic) दरम्यान, कोणकोणत्या ठिकाणी वाहतुकीत बदल होणार आहेत, (Pune Police) याबाबतची माहिती पुणे वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

हे मार्ग वाहतुकीसाठी असणार बंद आषाढी वारीनिमित्तानं अहमदनगर पोलिसांकडून वाहतूक बदल; वाचा, कोणते आहेत नवे मार्ग?

बोपोडी चौक, खडकी रेल्वे स्थानक, मरिआई गेट चौक, कमल नयन बजाज चौक, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाकडेवाडीपर्यंतचा रस्ता वाहतूक बंद असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी कळस फाटा ते विश्रांतवाडी चौक मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. येरवड्यातील मनोरुग्णालय ते आळंदी रस्ता चौक बंद राहणार आहे. तसंच, चंद्रमा चौक ते आळंदी रस्ता बंद असणार आहे.

नवीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक, होळकर पूल ते साप्रस चौकीपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. या कालावधीत आळंदीकडे जाणारे रस्ते आवश्यकतेनुसार बंद राहतील, बाकी रस्ते सुरू राहतील अशी माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. तसंच, अंतर्गत रस्त्याने चर्च चौक, भाऊ पाटील – ब्रेमेन चौक औंध मार्ग, रेल्वे पोलीस मुख्यालया समोरुन औंध टोड – ब्रेमेन चौक अंतर्गत रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. दरम्यान, बोपोडी चौकातून पुणे/मुंबई जाणारे वाहनांनी भाऊ पाटील रोडवरून औंध टोड मार्गे ब्रेमेन चौकातून इच्छितस्थळी जाव असंही सांगण्यात आलं आहे.

या पर्यायी मार्गांचा करा वापर ‘आता आमचं लक्ष्य विधानसभा..’ शरद पवारांनी सांगितला ‘त्या’ तीन महिन्यांचा प्लॅन

धानोरी रोडने व अंतर्गत रोड, जेल रोड – विमानतळ रोड मार्गे, पर्णकुटी चौक – गुंजन चौक – जेल रोड – गॅरीसन इंजिनिअरींग चौक – विश्रांतवाडी चौक अंतर्गत रस्त्यांचा वापर करावा लागणार आहे. रेंजहिल्स – खडकी पो. स्टे अंडरपास पोल्ट्री फार्म चौक- जुना मुंबई – पुणे महामार्ग, रेंजहिल्स – सेनापती बापट रोड, नळ स्टॉप चौक, खंडोजीबाबा चौक कर्वे रोड सेनापती बापट रोड – रेंजहिल्स, गाडगीळ पुतळा – कुंभारवेस चौक – आर.टी.ओ. चौक जहांगीर मार्गे, पोल्ट्री फार्म चौक, रेंजहिल्स मार्गे किंवा औंध मार्गे, घोले टोड व आपटे रोड, कुंभारवेस – पवळे चौक- फडके हौद चौक मालधक्का चौक – नरपतगीर चौक – पंधरा ऑगस्ट चौक कमला नेहरू हॉस्पिटल असा मार्ग आहे.

 

follow us