Download App

शरद मोहोळ हत्येत दोन वकिलही सहभागी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Sharad Mohol : कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) शुक्रवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या तपासात पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठे यश आले आहे. या हत्येप्रकरणी आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तीन पिस्टल, दोन चारचाकी वाहने मिळून आली आहेत. या गुन्ह्यात आरोपींची संख्या वाढली असून पोलिसांनी दोन वकिलांच्या मुसक्या आवळल्या आहेत. रवींद्र पवार आणि संजय उड्डाण या दोघा वकिलांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयात वकिली करतात. या गुन्ह्यात दोघा वकिलांची काय भूमिका आहे याचा तपास केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Sharad Mohol : कुख्यात गुंड शरद मोहोळचा ‘गेम’ करणाऱ्या एका आरोपीचे नाव अन् फोटो आला समोर

शरद मोहोळ याच्या हत्येप्रकरणी कोथरूड पोलिस स्टेशनला खून करणे, भारतीय हत्यार कायदा कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर पुणे शहर गुन्हे शाखेच्या नऊ पथकांनी तपास सुरू केला होता. ही पथके पुणे शहराच्या परिसरात आणि पुणे ग्रामीण, सातारा व कोल्हापूरच्या दिशेने तपास करत होती. पुणे सातारा रोडवर किकवी – शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करून 8 आरोपी, 3 पिस्टल, 3 मॅगझीन, 5 राउंड व 2 चार चाकी गाड्या ताब्यात घेण्यात आल्या.

त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने या वकिलांना शुक्रवारी रात्री अटक केली. या दोन्ही वकिलांना आता कोर्टात हजर केले जाणार आहे. या प्रकरणात त्यांचा काय सहभाग होता. आणखी कुण्या मोठ्या व्यक्तीचा सहभाग आहे का, हत्येचे कारण काय याचा शोध घेतला जात आहे. शरद मोहोळ याची हत्या जमिनीच्या, पैशाच्या जुन्या वादातून आरोपीनी केला असल्याचे प्रथमदर्शी तपासात निष्पन्न झाले आहे. मोहोळ याच्यावर गोळीबार करणाऱ्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर व त्यांना मदत करणाऱ्या आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे.

शरद मोहोळचा गेम कसा झाला? पोलिसांनी सांगितली ए टू झेड माहिती

 

follow us