Download App

Vinod Tawde : ओन्ली राष्ट्र म्हणत मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या विनोद तावडेंचा ‘यू टर्न’

Vinod Tawde On Maharashtra CM Post : भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी काल (दि.17) नागपूर येथे मुख्यमंत्रीपदाबद्दल जाहीर वक्तव्य केलं होतं. मात्र आता त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन यू टर्न घेतला आहे. ‘ओन्ली राष्ट्र, नो महाराष्ट्र’ म्हणत तावडेंनी मुख्यमंत्रीपदावरुन घुमजाव केलं आहे. ते पुण्यात (Pune BJP) राष्ट्रीय पुस्तक न्यास कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते.

नुकत्याच पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तीन राज्यात चांगले यश मिळवले असून, या तिन्ही राज्यांमध्ये भाजपकडून नव्या चेहऱ्यांना मुख्यमंत्रपदी संधी देण्यात आली आहे. त्यात राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कमिटीममध्ये भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी दिली होती. तिन्ही राज्यांमध्ये मुख्यमंत्री म्हणून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याने राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यात तावडेंचे नाव आघाडीवर घेतले जात आहे.

दाऊदच्या हस्तकाशी गिरीश महाजनांचे संबंध, खडसेंनी दाखवले सभागृहात फोटो

मी विजयाच्या भ्रमात नाही

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपनं तीन राज्ये जिंकली. मात्र, ही राज्ये मी जिंकून दिली या भ्रमात मी अजिबात नसल्याचे तावडेंनी यावेळी स्पष्ट केले. हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामांचा असल्याचे तावडे म्हणाले.

सेटलमेंट न झाल्याने अदानींविरोधात मोर्चा काढला का? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना तिखट सवाल

मी राष्ट्रीय पाताळीवर खूश आहे,  तिथं खूप शिकतोत. चांगलं काम करतोय. त्यामुळे मी आतापर्यंत अनेकवेळा सांगितले आहे की ओन्ली राष्ट्र, नो महाराष्ट्र असे म्हणत तावडेंनी मुख्यमंत्रीपदाबाबतच्या विधानावरून यू टर्न घेत तुर्तासतरी पूर्णविराम दिला आहे. पंकजा मुंडे राष्ट्रीय पातळीवर मागे पडत आहेत का? यावर तावडे म्हणाले की, पंकजा मुंडे या महाराष्ट्रत सक्रिय आहेत. सहप्रभारी म्हणून मध्यप्रदेशात देखील तेवढ्यात सक्रिय असल्याचे तावडे म्हणाले.

Tags

follow us