Government Schemes : पंतप्रधान मुद्रा लोन योजनेचा लाभ कोण अन् कसा घेऊ शकते?
Government Schemes : पंतप्रधान मुद्रा लोन योजनेंतर्गत (Pradhan Mantri Mudra Loan Yojana)कर्ज उत्पादन (Loan production), व्यापार आणि सेवांच्या माध्यमातून उत्पन्न नसलेल्या सूक्ष्म किंवा लघु उद्योगांना उपलब्ध करुन दिले जाते. संबंधित कृषी क्षेत्रातील उद्योजकदेखील मुद्रा कर्जासाठी अर्ज करु शकतात. मुद्रा कर्ज योजनेंतर्गत कर्जाची किमान रक्कम नाही, तर पीएमएमवाय अंतर्गत घेता येणारी कमाल कर्जाची रक्कम दहा लाख रुपये आहे.
मुद्रा कर्ज ही पीएम मोदींची योजना आहे. या योजनेंतर्गत बिगर शेती व बिगर कार्पोरेट सुक्ष्म व लघु उद्योगांना कर्ज दिले जाते. या संस्थांना (मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अॅण्ड रीफायनान्स एजन्सी लिमिटेड) या योजनेंतर्गत दहा लाख रुपयांचे कर्ज मिळते.
Giriraj Singh : हिंदुंनो हलाल नाही तर झटका मटणच खा! केंद्रीय मंत्र्यांनी दिला सल्ला
मुद्रा कर्ज योजनेंतर्गत मिळणारे फायदे :
– मुद्रा कर्ज योजना उत्पन्न निर्मितीमध्ये गुंतलेल्या सुक्ष्म आणि लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करते.
– मुद्रा कर्जाचा एक प्रमुख फायदा म्हणजे कर्जदारांना सुरक्षा किंवा दुय्यम सुविधा पुरवणे आवश्यक नसते.
– मुद्रा कर्जात कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
– पीएमएमवाय अंतर्गत विस्तारित पत सुविधा कोणत्याही प्रकारच्या फंड किंवा बिगर-फंड आधारित आवश्यकतांसाठी असू शकतात.
– कर्जदार मुद्रा कर्ज योजनेचा उपयोग विविध कारणांसाठी करु शकतात.
– मुद्रा कर्जाची पत मुदतीची कर्जे आणि ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी किंवा पत आणि पत हमीपत्रांसाठी अर्ज करण्यासाठी वापरली जाऊ शकते.
– मुद्रा कर्जासाठी कमीतकमी कर्जाची रक्कम नाही.
तीन प्रकारची मुद्रा कर्ज :
शिशु : पंतप्रधान मुद्रा लोन योजनेंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंतची कर्ज मंजूर होऊ शकतात.
किशोर : पंतप्रधान मुद्रा लोन योजनेंतर्गत 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत मंजूर होऊ शकतं.
तरुण : पंतप्रधान मुद्रा लोन योजनेंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर होऊ शकते.
पंतप्रधान मुद्रा लोनचं वैशिष्ट्य म्हणजे घेतल्या जाणाऱ्या कर्जावर प्रक्रिया शुल्क हे किशोर आणि शिशु कर्जासाठी शुन्य रुपये आकारले जाते. तर तरुण कर्जासाठी 0.5 टक्के रक्कम ही प्रक्रिया शुल्क म्हणून बँकांनुसार आकारली जाते.
कर्जाची परतफेड कशी?
पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेंतर्गत कर्ज घेतले असेल तर याचा तीन ते पाच वर्षादरम्यान परतफेड कालावधी असेल.
योजनेसाठी आवश्यक पात्रता :
– लघु उद्योग व्यवसाय मालक
– फळ आणि भाजी विक्रेते
– पशुधन दुग्ध उत्पादक
– कुक्कुटपालन
– मत्स्यपालन
– विविध शेतीविषयक उपक्रमांशी संबंधित दुकानदार
– कारागीर
मुद्रा लोन देणाऱ्या बँका कोणत्या?
– ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
– बँक ऑफ महाराष्ट्र
– देना बँक
– आईडीबीआई बँक
– कर्नाटक बँक
– स्टेट बँक ऑफ इंडिया
– यूनियन बँक ऑफ इंडिया
– सिंडिकेट बँक
– युनियन बँक ऑफ इंडिया
– आंध्र बँक
– पंजब नॅशनल बँक
– तमिळनाडु मरसेटाईल बँक
– कोटक महिंद्रा बँक
– सारस्वत बँक
– इलाहाबाद बँक
– अॅक्सिस बँक
– कॅनरा बँक
– फेडरल बँक
– इंडियन बँक
– बँक ऑफ इंडिया
– कॉर्पोरेशन बँक
– सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया
– एचडीएफसी बँक
– इंडियन ओवरसीज बँक
– यूको बँक
– बँक ऑफ बडोदा
-आयसीआयसीआई बँक
– जम्मू अॅण्ड काश्मिर बँक
– पंजाब अॅण्ड सिंध बॅंक
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रं :
– ओळखीच्या पुराव्यासाठी (आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स)
– पत्त्याच्या पुराव्यासाठी (विजबील किंवा गॅसबील किंवा नळपट्टीबील किंवा टेलिफोन बील)
– व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र
मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज कसा करावा?
– मुद्रा लोन योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे घेऊन जवळच्या बँकेत जावे.
– जागतिक भारतात जवळजवळ सर्व आर्थिक संस्थेमध्ये मुद्रा कर्जासाठी अर्ज करता येईल.
– बँकेत गेल्यानंतर आपल्याला मुद्रा कर्ज योजनेसाठी अर्ज भरावा लागेल आणि आपला वैयक्तिक व व्यावसायिक तपशील द्यावा लागेल.
– मुद्रा मंत्रालय कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी त्यांना किती रक्कम द्यायची आहे ते देखील तपासून घ्यावे.
– त्यामध्ये बँकेकडून मुद्रा लोन ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पर्याय दिला जाईल, त्यात शिशू, किशोर आणि तरुण हे तीन पर्याय असतील.
– तुमच्या व्यवसायानुसार या तिन्हीपैकी कोणताही एक पर्याय निवडून या योजनेंतर्गत कर्ज घेऊ शकता.
– अशा पद्धतीने तुम्ही या योजनेचा अर्ज करून लाभ घेऊ शकता, आणि आपल्या व्यवसायाला आर्थिक पाठबळ मिळवू शकता.
योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
– सर्वप्रथम आपल्याला मुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे.
– आता मुख्यपृष्ठ आपल्यासमोर उघडेल.
– मुख्य पृष्ठावर, आपल्याला लॉगिन बटणावर क्लिक करावे.
– पंतप्रधान मुद्रा लोन योजनावर क्लिक करावे
– आपल्यासमोर एक नवीन पृष्ठ उघडेल त्यामध्ये आपल्याला आपले युजननेम, पासवर्ड आणि कॅप्चा कोड भरावा लागेल.
– आपल्याला लॉगिन बटणावर क्लिक करावे.
(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.