Government Schemes : महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचा फायदा कोणाला अन् कसा घेता येईल?

Government Schemes : महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचा फायदा कोणाला अन् कसा घेता येईल?

Government Schemes : महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत मिळण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना (Maharashtra Unemployment Allowance Scheme)सुरु केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील (Maharashtra)सुशिक्षित बेरोजगार (Educated unemployed)तरुणांना शासनाने दरमहा 5 हजार रुपयांचा बेरोजगार भत्ता (Unemployment Allowance)दिला जातो.

Bhaskar Jadhav : राणे, शिंदेंची मिमिक्री अन् रामदास कदमांना बामलाव्या का म्हणतात? भास्कर जाधवांनी सांगून टाकलं

राज्यातील अनेक तरुण बेरोजगार आहेत. सुशिक्षित असुनही नोकरी नाही, या गोष्टींचा विचार करुन शासनाकडून ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मिळणाऱ्या भत्त्यामधून तरुणांच्या राहणीमानात बदल होईल.

नगर शहर सहकारी बॅंक फसवणूक प्रकरण : सीए विजय मर्दाला पोलीस कोठडी

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र (मार्कशीट)
ओळखपत्र
अर्जदाराचे आधार कार्ड
वय प्रमाणपत्र
उत्पन्नाचा दाखला
पत्ता पुरावा
मोबाइल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो

बेरोजगार भत्ता योजनेसाठी आवश्यक अटी :
– या योजनेचा राज्यातील सर्व बेरोजगार तरुणांना फायदा देण्यात येणार आहे.
– या योजनेंतर्गत राज्यातील सरकार बेरोजगार तरुणांना दरमहा 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करेल.
– या पैशाचा उपयोग युवक त्यांच्या दैनंदिन कामात त्यांच्या नियमित खर्चासाठी करतील.
– बेरोजगार तरुणांना नोकरी मिळेपर्यंत बेरोजगारी भत्ता देण्यात येईल.
– या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार किमान 12 वी पास असणे आवश्यक आहे.
– बेरोजगारी भत्ता निश्चित वेळेसाठी देय असणार आहे.

योजनेसाठी पात्रता
– अर्जदार महाराष्ट्राचा कायम रहिवासी असावा.
– अर्जदाराचे कमीत कमी वय 21 आणि जास्तीत जास्त 35 वर्षे असावे.
– या योजनेचा फायदा घेणाऱ्या अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यजक आहे.
– अर्जदाराकडे उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नसेल तरच या योजनेचा फायदा घेता येईल.
– या योजनेंतर्गत फायदा घेणारा अर्जदार सरकारी किंवा बिगर सरकारी नोकरी किंवा कोणत्याही व्यवसायाशी संबंधित असल्यास त्याला लाभ घेता येणार नाही.
– अर्जदाराची शैक्षणिक पदवी आणि कोणत्याही व्यावसायिक किंवा नोकरीभिमुख कोर्समध्ये पदवी नाही.

ऑनलाईन अर्ज कसा करावा?
– सुरुवातीला https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेतस्थळाला भेट द्या.
– होमपेजवर तुम्हाला Job Aspirant Login चा पर्याय दिसून येईल.
– याच्या खाली Register चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करावे.
– यावर क्लिक केल्यानंतर,एक नोंदणी फॉर्म दिसेल, या नोंदणी फॉर्ममध्ये आधार क्रमांक, मोबाईल नंबर आदी संपूर्ण माहिती भरावी.
– माहिती भरल्यानंतर, नेक्स्ट बटणावर क्लिक करावे.
– मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल, त्यानंतर तुम्हाला हा OTP टाकावा लागेल आणि सबमिट बटणावर क्लिक करावे.
– लॉगिन करण्यासाठी मागील पृष्ठावर परत जावे लागेल, आता तुम्हाला लॉगिन फॉर्ममध्ये कॅप्चा कोडसह युजरनेम आणि पासवर्ड भरावा लागेल, आणि नंतर लॉगिन बटणावर क्लिक करा, त्यानंतर तुमच्या अर्ज पूर्ण होईल.

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube