केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय; सिया गोयल अन् प्रियकराला सुट्टी नाही

सिया गोयलचा भाऊ साहिल गोयलला लोणावळा पोलिसांनी जबाब घेण्यासाठी बोलवलं आहे. त्याचीही चौकशी होणार आहे.

Agraval

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय; सिया गोयल अन् तिचा प्रियक अडकणार

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. (Pune) आज केतनच्या वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केतनच्या वडिलांनी केली होती, ती मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे. याबाबत सीएमओकडून ट्विट करत माहिती देण्यात आली आहे.

लोणावळा ग्रामीण परिसरात झालेल्या केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी हत्येच्या प्रकरणात केतन अग्रवाल यांचे वडिल विशाल अग्रवाल यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी त्यांना दिले.

चांगल्या घरच्या मुला-मुलींमध्ये सूडबुद्धी का? यासाठी समाज… केतन अग्रवाल हत्येवर फडणवीसांचं मोठं विधान

या प्रकरणात जलदगती न्यायालय आणि विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची त्यांची मागणी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मान्य केली आणि तसे निर्देश विधी व न्याय विभागाच्या सचिवांना दिले. ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनीही या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास संमती प्रदान केली आहे.’ असं ट्विट महाराष्ट्र सीएमोच्या वतीनं करण्यात आलं आहे.

दरम्यान आता या प्रकरणात पोलिसांनी सियाच्या भावाला देखील चौकशीसाठी बोलावलं आहे. त्याची गेल्या दोन तासांपासून चौकशी सुरू आहे. याबाबत लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी माहिती दिली आहे. ‘सियाचा भाऊ साहिल गोयलला लोणावळा पोलिसांनी जबाब घेण्यासाठी बोलवलं आहे,गेल्या काही तासापासून त्याची चौकशी सुरू असून, जबाब नोंदणी सुरू आहे.

Exit mobile version