Amit Shah Pune visits : लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) पहिल्यांदाच महाराष्ट्रात आले आहेत. लोकसभेत जो फटका बसला तसा आता पुन्हा बसणार नाही याची काळजी आता केंद्रीय नेतृत्वाकडून घेतली जात असल्याचं दिसतय. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती तयार करण्यासाठी अमित शाह पुण्यात दाखल झाले आहेत. काल विशेष विमानाने मुंबईत उतरल्यानंतर ते पुण्यात दाखल झाले. आज पुण्यातील बालेवाडी येथे (BJP) भाजपची चिंतन बैठक आयोजीत करण्यात आली आहे.
विधानसभेचा रोडमॅप मलाही चित्रपट काढायची इच्छा, पण अनेक जणांचे मुखवटे देवेंद्र फडणवीस धर्मवीर-2 वर काय बोलले?
लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांत भाजपला राज्यात सपाटून मार खावा लागला. त्यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज पुण्यात भाजपचं चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलं असून या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद थेट साधला जाणार असून या बैठकीत ते विधानसभेचा रोडमॅप सादर करण्याची शक्यता आहे. या सोबतच लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर देखील चिंतनही केलं जाणार आहे.
बांगलादेशात आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण; १०५ जणांचा मृत्यू, ४०० भारतीय नागरिकांची सुटका
पुण्यात होणाऱ्या आजच्या चिंतन बैठकीत सुमारे पाच हजारांहून अधिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्या सर्वांना अमित शहा हे मार्गदर्शन करणार आहेत. यात ते विधानसभा निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने जास्तीत जास्त जागा लढवायच्या व मित्र पक्षांना देखील योग्य उमेदवार निवडण्यासाठी आग्रह धरायचा, अशी रणनीती भाजपने आखल्याची समजतं.
पुण्यात बालेवाडीतील शिव छत्रपती क्रीडा संकुलात भाजपची ही चिंतन बैठक आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी तब्बल एक हजार पोलिसांचा बंदोबस्त बालेवाडी परिसरात तैनात करण्यात आला आहे. या बैठकीत पक्षाचे वरिष्ठ नेते सहभागी होणार आहे. राज्यातील आमदार खासदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तसंच, राज्यभरातील प्रमुख कार्यकर्तेही या बैठकीला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे आज बालेवाडी भागातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.