शिरूर नगरपरिषदेत अभूतपूर्व स्थिती; भाजप, लोकशाही आघाडीनंतर धारीवालांचीही माघार

Prakash Dhariwala यांनी शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवार न देण्याची घोषणा केली आहे

Untitled Design (8)

Untitled Design (8)

Unprecedented situation in Shirur Municipal Council; After BJP, Democratic Alliance, Dhariwala also withdraws : सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसह सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. यामध्ये आता पुणे जिल्ह्यातील शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय भूकंप झाल्याचा पाहायला मिळत आहे. कारण या निवडणुकीमध्ये शिरूर शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा, उद्योगपती आण माजी नगराध्यक्ष प्रकाश धारीवाल यांनी उमेदवार  न देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शिरूरच्या राजकारणात भूकंप आला असून राजकीय समीकरणे विस्कळीत झाल्याचे बोलले जात आहे.

एखादी बाई तुरूंगात टाकली म्हणजे… जयकुमार गोरेंवर टीका करताना जानकरांची जीभ घसरली

दरम्यान या अगोदर शिरूरमधील लोकशाही क्रांती आघाडीने निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याचबरोबर शिरूरचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या निधनामुळे भाजपचेही महत्त्वाचे नेते बॅकफूटवर गेले आहेत. त्यामुळे शिरूरच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे या तीनही पक्षांनी माघार घेतल्याने शिरूरच्या या राजकीय पोकळी भवितव्य काय असणार? असा सवाल उपस्थित झाला आहे.

फॅब्रिकेशन व्यवसायिकाकडून दृश्यम स्टाईल खून; पत्नीला संपवलं, भट्टीत जाळून राखही नदीत फेकली

आपल्या घोषणेबाबत बोलताना धारीवाल यांनी सांगितलं की, वडिलांच्या निधनानंतर आपल्यावर व्यवसायाची जबाबदारी आली आहे. आपला व्यवसाय अनेक राज्यांमध्ये असल्याने त्याकडे पूर्ण वेळ लक्ष द्यावे लागते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मी सहभागी होणार नाही. त्याचबरोबर मी कुठल्याही पक्षाचा नाही. त्यामुळे नंतर धारिवाल्यांच्या घोषणा नंतर अनेक कार्यकर्ते नाराज झाले. त्यांनी या घोषणेवर पुन्हा निर्णय घ्यावा. यासाठी त्यांच्यावर दबाव निर्माण झाला असल्याने ते पुन्हा विचारणार का? असे देखील बोलले जात आहे.

Exit mobile version