Download App

Unseasonable Rain : पुण्यात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग…

राज्यातील विविध जिल्ह्यांच्या तापमानात वाढ होत असतानाच आता पुण्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. पुण्यातल्या काही भागांत अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून पुण्यातील कोथरुड, सिंहगड मार्गावर मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली होती.

Rahul Gandhi : फक्त ‘डिसमिस’ म्हणत न्यायाधिशांनी संपवला विषय; आता पुढे काय?

या जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. या पावसाचा जोर अधिक असल्याने रस्त्यांवरील गाड्यांची ये-जा, नागरिकांची गर्दी एकदमच बंद झाल्याचं दिसून येत आहे.
एकंदरीत पाहता पुण्यात सध्या सुरु असलेला जोरदार पाऊस पुढील दोन ते तीन राहणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.

अतिक-अश्रफला गोळ्या घातल्यानंतर मारेकऱ्यांनी का दिला ‘जय श्री राम’चा नारा?

मागील काही दिवसांपासून उन्हाने लाईलाई होत असतानाच अचानक जोराचा पाऊस आल्याने पुणेकरांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येत असून पुणेकर या पावसात भिजण्याचा आनंद लुटत आहेत.

काही दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांना फटका बसला आहे. राज्यातील विविध भागांत अवकाळीने थैमान घातल्याने शेतकरी वर्ग अर्थिक संकटात सापडलाय. आधीच शेतीपिकांना हमीभाव नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. अशातच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे होत्याचं नव्हतं झाल्याचं दिसून येतंय.


Horoscope Today, April 20, 2023: ‘या’ राशींना मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…

अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, बाजरी, फळबागा, टरबूज, द्राक्षे, खरबूज अशा विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे. पुण्यातील ग्रामीण भागांतील शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसत आहे.

दरम्यान, आज दुपारच्यादरम्यान पुण्यात अचानक ढगाळ वातावरण तयार झाल्याने कोणत्याही क्षणी पाऊस येणार असल्याची शक्यता होती. अखेर दुपारनंतर पुण्यात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे.

Tags

follow us