Sunil Tingre News : राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झालीयं. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु झालीयं. अशातच पुण्यातील वडगावशेरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनिल टिंगरे (Sunil Tingare) यांचं तिकीट कापलं असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. माध्यमांमध्ये यासंदर्भातील बातम्या प्रसारित होताच लेटस्अप मराठीने टिंगरेंशी संवाद साधून शहानिशा केलीयं. यावेळी बोलताना टिंगरे म्हणाले, अजितदादांनी मला स्वत: शब्द दिला असून वडगावशेरी मतदारसंघातून माझी उमेदवारी पक्की असल्याचं टिंगरेंनी स्पष्ट केलंय. त्यामुळे टिंगरे यांचं तिकीट कापल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळालायं.
उद्धव ठाकरे, राहुल गांधींची सहमती घेतली का?, CM पदासाठी जयंत पाटलांचे नाव पुढे येताच मुंडेंचा टोला
वडगाव शेरी मतदारसंघात सुनिल टिंगरे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघातून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान नाराजी असल्याचं समोर आलं होतं. भाजपच्या नेत्यां पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत भाजपच्य पदाधिकाऱ्यांनी सुनिल टिंगरे यांच्या नावाला विरोध दर्शवत भाजपचा उमदेवार नसल्यास काम करणार नसल्याचा पवित्रा घेतल्याचं दिसून आलं होतं. तर याच मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक इच्छूक आहेत, त्यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. एवढंच नाही तर लोकसभा निवडणुकीत खासदार मुरलीधर मोहोळ यांचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नसल्याचा आरोप केला होता. त्यामुळे आता विधानसभेला राष्ट्रवादीच्या उमेदवार दिल्यास काम करणार नसल्याचं कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं होतं.
मोठी बातमी! मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघात; कार अन् ट्रॅव्हलची धडक
वडगाव शेरी मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत पंकजा मुंडेंसमोरच ही तक्रार आल्याने एकच चर्चा रंगली होती. या मुद्द्यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांकडून दुसऱ्या उमेदवाराची मागणी होतेयं, प्रत्येकाला आपल्या नेत्याला उमेदवारी मिळावी, असं वाटणं नैसर्गिक आहे. शेवटी पक्ष जो अंतिम निर्णय घेईल, तो निर्णय भाजपचे सर्वच पदाधिकारी मान्य करतील, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं होतं.
महायुतीमध्ये या प्रकारानंतर आता सुनिल टिंगरे यांचं तिकीट कापलं जाणार असल्याची शक्यता आहे, अशी चर्चा सुरु होती. माध्यमांमध्ये तिकीट कापल्याची शक्यता असल्याची बातमी येत असल्याने एकच खळबळ उडाली. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळालायं. मला अजितदादांनी स्वत: शब्द दिला असल्याचं सुनिल टिंगरेंकडून स्पष्ट करण्यात आलंय.त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मलाच तिकीट मिळणार असल्याचा दावा टिंगरे यांच्याकडून करण्यात येत आहे. आता निवडणुकीत वडगावशेरीतून कोणाला तिकीट मिळणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.