मोठी बातमी! मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघात; कार अन् ट्रॅव्हलची धडक
Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारचा अपघात (Road Accident) झाला आहे. आज पहाटेच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर हा अपघात (Car Accident) घडला. धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे यांची कार आणि ट्रॅव्हल यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघात राजश्री मुंडे या किरकोळ जखमी झाल्या आहेत.
या अपघातात राजश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. हा अपघात सोरतापवाडी परिसरात घडली. येथे कार आणि ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली. पहाटेच्या वेळी हा अपघात झाला. त्यामुळे येथील वाहतूक काही काळ ठप्पा झाली होती. दोन वाहनांची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. येथील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
नवा मेळावा सुरू करून भगवानगड मेळाव्याची पवित्रता कुणी संपवू शकत नाही; धनंजय मुंडेंचा जरांगेंना टोला
या अपघातात राजश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे समजते. अपघात नेमका कशामुळे घडला याचं कारण अजून समजलेलं नाही. महामार्गावर पहाटेच्या वेळी वाहनांची वर्दळ फार नव्हती. यावेळी दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून तपास सुरू केला आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण पोलीस तपासातूनच स्पष्ट होईल. पुणे सोलापूर महामार्गावर वाहतूक वाढली आहे. त्यामुळे येथे अपघातांचीही संख्या वाढली आहे. वाहनांचा वेग भरधाव असतो. वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
दरम्यान, रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव (Road Safty) असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे.