भीषण अपघात! भरधाव वेगातील दुचाकी बसला धडकली; तिघांचा मृत्यू
Road Accident in Buldhana : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने (Road Accident) वाढ होत आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन वाहनचालकांकडून होत नसल्याने रस्ते अपघातांची संख्या वाढली आहे. आताही असाच एक भीषण अपघाताची बातमी बुलढाण्यातून (Buldhana News) आली आहे. भरधाव वेगातील दुचाकीस्वारांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एसटी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील तीन युवकांचा मृत्यू झाला. बुलढाणा तालुक्यातील चिखली तालुक्यातील वरदडा फाटा परिसरात मंगळवारी रात्री ही घटना घडली.
मोठा अपघात! नंदुरबारच्या घाटात भरधाव ट्रक शिरला मेंढ्यांच्या कळपात, 100 हून अधिक मेंढ्यांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार मयत तरुण चिखली तालुक्यातील रहिवासी होते. काही कामानिमित्त तिघे जण बाहेरगावी गेले होते. रात्री उशिरा चिखली ते मेहकर मार्गावरून दुचाकीने येत होते. त्याचवेळी वरदडा फाट्यावर एक एसटी बस बंद पडली होती. रस्त्याच्या कडेला होती. परंतु, दुचाकीस्वाराल रात्रीच्या अंधारात बस दिसली नाही. त्यामुळे दुचाकीची जोरदार धडक एसटीला बसली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव (Road Safty) असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे.
अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी या महामार्गावर अपघात सातत्याने होत आहेत. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे. परंतु त्यानुसार कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत चालली आहे.
मुंबईत अग्नितांडव! भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू; झोपेतच काळाने गाठलं