मोठा अपघात! नंदुरबारच्या घाटात भरधाव ट्रक शिरला मेंढ्यांच्या कळपात, 100 हून अधिक मेंढ्यांचा मृत्यू

मोठा अपघात! नंदुरबारच्या घाटात भरधाव ट्रक शिरला मेंढ्यांच्या कळपात, 100 हून अधिक मेंढ्यांचा मृत्यू

A Heavy Truck Crushed The Sheep :  नंदुरबार जिल्ह्यातून एक अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वाहनाच्या कोंडाईबारी घाटात भरधाव ट्रकने मेंढ्यांना चिरडलं. यामध्ये सुमारे 100 हून अधिक मेंढ्या ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी, रस्त्यावर मेंढ्यांच्या मृतदेहांचा खच पडला आहे. या अपघातामुळे मेंढ्या पाळणाऱ्यांचे मोठं आर्थिक नुकसान झालं असून शोककळा पसरली आहे.

मुंबईत अग्नितांडव! भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू; झोपेतच काळाने गाठलं

धुळ्याहून सुरतच्या दिशेने जाणारी क्रमांक ए पी 31 पी जी 0869 या वाहनाने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या जवळ जवळ 100हून अधिक मेंढ्यांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अपघात झाल्याची माहिती पोलिसांना माहिती मिळताच पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाला आहे. कोंडाईबारी घाटात वारंवार अपघात होत असतात. मात्र, उपायोजना शून्य दिसून येत आहेत. तर या अपघताचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.

मेंढपाळांवर दुःखाचा डोंगर

या घटनेतील मेंढ्यांचे मालक लखा गोविंदा गोईकर, बाळु सोमा गोईकर, दगडु गोईकर (रा. विजापूर ता. साक्री जि.धुळे) हे आपल्या शेकडो मेंढ्यांचा कळप घेऊन विसरवाडीच्या दिशेने गुजरात राज्यात जात होते. दरम्यान, मागून येणारा एका भरधाव ट्रकने त्याच्या 100हून अधिक मेंढ्यांना अक्षरक्ष: चिरडल्या आहेत. हा ट्रक आंध्रप्रदेश राज्याकडून गुजरातकडे जात होता. ट्रकचालक रमेश दुगंला (राजू) या ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावर हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, मेंढपाळाला ताब्यात घेतलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या