Download App

मोठी बातमी! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण; सासरा आणि दीर यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

Vaishnavi Hagawane Father-in-law and brother-in-law remanded  police custody : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी (Vaishnavi Hagawane Death) तिच्या सासरच्या मंडळीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane), दीर सुशील हगवणे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी तर नवरा शशांक, नणंद करीश्मा आणि सासू लता यांना एक दिवसाची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली होती. वैष्णवीने असं टोकाचं पाऊल उचललं, यामागे हुंड्यासाठी झालेला छळ, कौटुंबिक हिंसाचार, (Pune Crime) असे आरोप आहेत. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे सासरे आणि दीर दोघंही फरार झाले होते. त्यांना आठ दिवसांनी अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं. आता या प्रकरणात वैष्णवीचा सासरा, दीर, नवरा, सासू आणि नणंद यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

मिठीच्या घोटाळ्यामध्ये गुन्हे दाखल होणार; आमदार रवी राणांचा ठाकरे पिता-पुत्रांना इशारा

पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे 16 मे 2025 रोजी ही घटना घडली होती. शशांक हगवणे या 23 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपवलं होतं. वैष्णवी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. तिच्या मृत्यूमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली. वैष्णवीच्या माहेरच्यांनीसासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला गेला.

लग्नाच्या वेळी 51 तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या वैष्णवीच्या माहेरच्या लोकांनी सांगितलं. परंतु नंतर सुद्धा सासरची मंडळी वैष्णवीकडून आणखी पैशांची मागणी करत होती. हगवणे कुटुंबाने वैष्णवीला घराबाहेर सुद्धा काढलं होतं. वारंवार होणाऱ्या या छळाला कंटाळूनच वैष्णवीने आत्महत्या केल्याचं सांगितलं जातंय. तर वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा पती शशांक याला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलंय.

विदेशातील फंडिंग घेणाऱ्या NGO सरकारच्या रडारवर; न्यूज कंटेंटवर बंदी, खर्च अन् नोंदणीच्या नियमांत काय?

वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह होता. या लग्नाला वैष्णवीच्या माहेरच्या लोकांचा म्हणजेच कस्पटे कुटुंबाचा विरोध होता. तो पत्करून वैष्णवीने लग्न केलं होतं. शिवाय थाटामाटाक हा लग्नसोहळा पार पडला होता. तर वैष्णवी गरोदर असताना 2023 मध्ये शशांक तिच्यावर संशय घेत होता, असं वैष्णवीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं आहे.

 

follow us