Download App

पुणे ते नेपाळ…पोलिसांनी निलेश चव्हाणचं लोकेशन कसं शोधलं? सिमकार्डमुळे मोठा गेम फसला

Vaishnavi Hagawane Case Nilesh Chavan Arrested Update : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील ( Vaishnavi Hagawane Case) आरोपी निलेश चव्हाणला नेपाळ सीमेवरून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. निलेश चव्हाणला ( Nilesh Chavan) अटक करताना तांत्रिक विभागाचं पोलिसांना महत्वाचं सहकार्य लाभलं आहे. खरं तर निलेश वापरत असलेलं सिम कार्ड नेपाळमधील होते, त्यामुळे त्याचा माग काढणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. यामध्ये अनेक अडथळे देखील येत होते. परंतु पोलिसांनी कस पणाला लावत निलेश चव्हाणला नेपाळच्या सीमेवरून अटक केली आहे.

शेकडो सीसीटीव्ही तपासले

पोलिसांना तपासात माहिती मिळाली की, निलेश चव्हाण 25 मे रोजी दिल्लीहून गोरखपूर दरम्यान खासगी बसने गेला होता. त्याचं लोकेशन सुद्धा पोलीस तपासात ट्रेस झालं होतं. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर यात्री खात्री सुद्धा (Pune Crime) झाली. परंतु गोरखपूरमध्ये उतरल्यानंतर निलेश नेमका कुठे गेला? याचा काही तपास लागत नव्हता. त्यानंतर पुन्हा शेकडो सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यानंतर तो नेपाळला गेल्याचं स्पष्ट झालं.

सिगारेटचा धूर अन् तोंडातली तंबाखू धोकादायकच पण किती? जाणून घ्या, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा

दहा दिवस फरार

वैष्णवी हगवणे प्रकरणी निलेश चव्हाण हा एकूण दहा दिवस फरार होता. सुरूवातीला तो पुण्यातून रायगड गेला. तेथून दिल्ली अन् दिल्लीवरून त्याने गोरखपूर गाठले. तिथून त्याने उत्तर प्रदेशमध्ये प्रवास केला. सोनौली येथूनच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं (Pune Police) आहे. यादरम्यान तो नेपाळमधून काठमांडू अन् भैरवा येथे देखील गेला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ कंपनीला सरकारची नोटीस; संशयास्पद व्यवहारांचा मागितला खुलासा

अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

पिंपरी चिंचवड पोलिसांनी 30 मे रोजी भारत नेपाळ सीमेवरील उत्तर प्रदेशच्या सोनोली इथे निलेश चव्हाणला बेड्या ठोकल्या आहेत. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांची सहा पथके तैनात करण्यात आली होती. पुणे पोलिसांची तीन पथके त्याच्या मागावर होती. मधल्या काळात निलेश चव्हाणचा पुणे, मुंबई, कोकण, कर्नाटक, गोवा या राज्यांत देखील शोध घेतला जात होता. त्याच्या संपर्कातील अनेक मित्र आणि नातेवाइकांची चौकशी केली होती. अखेर तांत्रिक तपासाच्या माध्यमातून त्याचे धागेदोरे पोलिसांना मिळाले अन् पोलीस नीलेश चव्हाणपर्यंत पोहोचण्यात यशस्वी देखील ठरले.

नीलेश चव्हाण भारतीय मोबाईल सिम कार्ड न वापरता नेपाळमधील सिम कार्ड वापरत होता. त्यामुळं त्याचा शोध घेणे जरा अवघड जात होते. तसेच निलेश त्या सिमकार्डच्या माध्यमातून नेपाळमधील इंटरनेटचा वापर सुद्धा करत होता. आता या प्रकरणात नीलेश चव्हाण याला अटक झाली आहे. त्यामुळे अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

follow us