Download App

शरद पवार मनोज जरांगेंच्या पाठीशी हे आता क्लिअर झालंय : प्रकाश आंबेडकर

आम्ही सध्या जे बघतो आहोत त्यावरून क्लिअर झालं आहे की शरद पवार हेच मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहेत.

Prakash Ambedkar Press Conference : राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा होत असल्याचं चित्र दिसत आहे. जालना जिल्ह्यात वडीगोद्री येथे ओबीसींच्या आरक्षणासाठी लक्ष्मण हाके उपोषण करत आहेत तर बाजूलाच आंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील सहाव्यांदा (Manoj Jarange Patil) उपोषण करत आहेत. दोन्ही नेत्यांचे समर्थक आक्रमक झाल्यामुळे काहीसा तणाव पाहायला मिळत आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, जालनासह काही जिल्ह्यांत बंद पाळण्यात आला आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही (Sharad Pawar) भाष्य केलं होतं. मराठा समाज सर्वांना घेऊन चालतो. मनोज जरांगे यांची जी मागणी आहे ती योग्य आहे. त्यामध्य सर्वांचा विचार करणं महत्वाचं असे शरद पवार म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी (Prakash Ambedkar) भाष्य केलं.

Sharad Pawar : महाविकास आघाडी नाना पटोलेंना मुख्यमंत्री करणार?, शरद पवारांनी काय दिलं उत्तर

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?

आदिवासी, धनगर समाज यांबाबत कोर्ट जो निर्णय देईल तो आपण मान्य करायचं असं आमचं ठरलं आहे. आम्ही सध्या जे बघतो आहोत त्यावरून क्लिअर झालं आहे की शरद पवार हेच मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहेत. मराठा आरक्षणासोबत आहेत असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. विधानसभा पाहून ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) निर्णय घेतील असं वाटत आहे. ओबीसींनी आता निर्णय घ्यायला हवा. ओबीसी आरक्षण वाचवायचं असेल तर ओबीसींचे किमान १०० आमदार निवडून यायला हवेत. ओबीसी कोट्यात शिवसेना उद्धव ठाकरे आणि एनसीपी शरद पवार ओबीसींसोबत नाहीत हे आता स्पष्ट झाल्याचं आंबेडकर म्हणाले. ओबीसीमधून आरक्षण देऊ नये याला आमचा पाठींबा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले होते शरद पवार ?

शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरन उपोषणाला पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले होते की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जातीधर्माला सोबत घेऊन चालणारे राजे होते. त्याच गोष्टीचा मराठा समाजाने आदर्श घेतलेला आहे. आज राज्यात मराठा समाज सर्वांना घेऊन चालतो. मनोज जरांगे यांची जी मागणी आहे ती योग्य आहे. त्यामध्य सर्वांचा विचार करण महत्वाचं आहे. आज राज्यात आरक्षणाबाबत जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर सरकारने तोडगा काढावा.

मराठा समाज हा सर्वांना सोबत घेणारा समाज; मनोज जरांगेंच्या भूमिकेला आमचा पाठिंबा -शरद पवार

follow us