Download App

Vasant More पुन्हा नाराज : कसब्यातील ‘बॅनर’वरून दिला ‘हा’ इशारा

Vasant More : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वसंत मोरे हे पुन्हा एकदा नाराज झाले आहेत. कसबा मतदार संघात राम नवमी निमित्त लावलेल्या बॅनरवरून त्यांनी ही नाराजी जाहीररित्या बोलून दाखवली असून आपल्याला जाणूनबुजून डावलले जात असल्याचा आरोप केला आहे. मला पक्षात सातत्याने जाणूनबुजून डावलण्याचा प्रयत्न काही जण करत आहे, असा देखील आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

वसंत मोरे यांच्या नाराजीची सध्या पुणे शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. यापूर्वीही मोरे यांनी पक्षांतर्गत काही जण आपल्याला जाणूनबुजून त्रास देत असल्याची तक्रार थेट राज ठाकरे यांच्याकडे केली होती. तेव्हा राज ठाकरे यांनी मध्यस्थी करत हे प्रकरण शांत केले होते.

मात्र, आता पुन्हा एकदा कसब्यातील एका बॅनरवरून पुण्यातील मनसे गटात अंतर्गत वाद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वसंत मोरे यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यामुळे ते लवकरच मनसेला रामराम करणार असल्याचे बोलले जात आहे.

अजित पवारांना कोर्टाची भाषाच समजत नाही…फडणवीसांचा टोला – Letsupp

याबाबत वसंत मोरे यांनी सांगितले की, राम नवमी निमित्ताने मनसेने कसबा मतदार संघात एक बॅनर लावला आहे. त्यात मनसेच्या ११ पैकी ९ जणांची नावे टाकली आहेत. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशांत यादव यांचे नाव टाकले आहे. परंतु, माझे नाव टाकले नाही. म्हणजे मनसेच्या बॅनरवर आरएसएसच्या कार्यकर्त्यांचे नाव चालते. पण माझं चालत नाही, हा प्रकार मुद्दाम केला जात आहे. पक्षातील काही जण हे जाणीवपूर्वक करत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार जाणूनबुजून केला जात आहे. आता मलाही या गोष्टींचा राग येत आहे. जर पक्षातील काही जणांना माझा त्रास होत असेल, तर मलाही काहीतरी ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे. आता मला वरिष्ठ पातळीवर थेट राज ठाकरे यांच्याबरोबर मला बोलावे लागणार आहे. त्यांना मी आता थेटच सांगणार आहे की, या गोष्टी तरी बंद करा. नाहीतर मला तरी काय निर्णय घ्यायचे ते सांगा, असा निर्वाणीचा इशाराच वसंत मोरे यांनी दिला आहे.

(245) Ajit Pawar LIVE | ABP Majha Live | Marathi News today | Maharashtra – YouTube

Tags

follow us