Vasant More Post On Reel Star Atharva Sudame : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) कौतुक केलेल्या रिलस्टार अथर्व सुदामेला पूर्वाश्रमीचे कट्टर मनसैनिक वसंत मोरेंनी थेट धममकी दिली आहे. याबाबत मोरेंनी त्यांच्या फेसबुकपेजवरून एक पोस्ट केली आहे. मात्र, मोरेंच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनीची कमेंट करत तात्यांचाच घाम काढला आहे.
वसंत मोरेंची पोस्ट नेमकी काय?
रिल स्टार असलेल्या अथर्व सुदामेला उद्देशून लिहिलेल्या पोस्टमध्ये वसंत मोरेंनी लिहिले आहे की, अथर्व सुदामे रिल तयार करून स्वतःचे पोट भरतो खरा पण हा आम्ही पुणेकरांच्या इज्जतीशी खेळतो. खरा पुणेकर असशील तर हे प्रकार बंद कर नाहीतर एक दिवस निवांत वेळ काढून तुझ्याकडे पहावं लागेल अशा शब्दांत वसंत मोरे यांनी धमकी वजा इशारा दिला आहे. मात्र, त्यांच्या या पोस्टवर पुणेकरांनी तात्यांना साथ देण्याऐवजी त्यांनाच खडेबोल सुनावल्याचे दिसून येत आहे.
नेटकऱ्यांनी तात्यांचाच काढला घाम
रिल्सच्या माध्यमातून पुणेकरांची चेष्टा करणाऱ्या अर्थव सुदामेला कडक शब्दांत इशारा दिल्यानंतर वसंत मोरेंच्या पोस्टवर अनेक यूजर्सकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. मात्र, या सर्व प्रतिक्रिया वसंत मोरेंच्या बाजूने नव्हे तर, त्यांना खडेबोल सुनावणाऱ्या आहेत. यात एका यूजरने म्हटले आहे की, कुठ या अशा शुल्लक गोष्टीवर लक्ष देता..इतर खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत लक्ष द्यायला असा टोला लगावला आहे.
राज साहेबही अर्थवचे फॅन
धनंजय गोरड या यूजरने आपले राजसाहेबदेखील अथर्वचे फॅन असल्याचे म्हणत तात्यांना सुनावले आहे. इतर खूप मोठे प्रश्न आहेत पुण्याचे परप्रांतीय येऊन गुन्हे करत आहेत, अतिक्रमणे करत आहेत, रस्ते फुटपाथ अतिक्रमण मध्ये आहेत, परप्रांतीयटोळ्या आणि ग्रुप बनवून दहशत माजवत आहेत, रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत, पुणे शहरात सगळ्या रिक्षा वर अनेक फिक्स भावी आमदार झालेत, पुण्याची लोकसंख्या आणि जागा यांचे लिमिट संपले आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून या विषयावर आपल्याकडून अपेक्षा आहेत. पुणेकरांच अपमान झाला असेल तर त्यावर अनेक जण विनोद करत आहेत सरसकट सगळ्यांना जाब विचारा असे गोरड यांनी कमेंटमध्ये म्हटले आहे.
तर, एका यूजरने लवकरच सुदामे आणि वसंत मोरे एकाच रिलमध्ये दिसतील असे भाकित वर्तवत वसंत मोरेजी आपण नको त्या विषयात राजकारण आणू नका. तुमचीच चांगली प्रतिमा खराब होईल. पुणेकरांची विनोद बुद्धी शाबूत आहे तुम्ही पण पुणेकर आहात उगाच नको त्यामुळे विनोदाला विनोद म्हणून घ्या… विनोद हा विषय आपल्याला कळत नसेल तर सोडून द्या पण सुदामे वगैरे पोरांना नका छळू विनाकारण असे म्हटले आहे.
शरद पवारांचा राज ठाकरेंवर जोरदार पलटवार.. म्हणाले, मी या रस्त्याने कधी जात नाही, मला महाराष्ट्र..
स्वतःची अनोखी शैलीच्या माध्यमातून आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांवर मार्मिक अन् खोचक भाष्य करणं ही अथर्व सुदामेची कला. जनसामान्यांना रोजच्या आयुष्यात सामोरे जावा लागणाऱ्या अनेक गोष्टींचे विनोदी चित्रण करून ते रिल स्वरुपात मांडण्याचं काम अथर्व करतो. पुणेकरांच्या समस्यांवरही त्याने असेच भन्नाट रिल्स बनवले आहेत.