Download App

Vasant More : पुण्याच्या मैदानात ‘तात्यांची’ एन्ट्री; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संघर्षात मनसेने आणली रंगत

Vasant More : भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनामुळे पुणे लोकसभेची (Pune Lok Sabha) जागा रिक्त झाली. या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मात्र पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या जागेवर हे दोन्ही पक्ष लढण्यासाठी इच्छुक आहेत. अशातच आता मनसेही ही जागा लढवणार असल्याचं दिसतं. मनसेने फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे वसंत मोरे (Vasant More) यांना उमेदवारी द्यावी अशी मनसैनिक करत आहेत. (Vasant More’s name is heavily discussed for the Pune Lok Sabha by-election)

वसंत मोरे यांनी पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली. तर मनसे कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर तशी इच्छा व्यक्त केली. कार्यकर्त्यांच्या या इच्छेला प्रतिसाद देत मोरे यांनी या चर्चांना आणखीनच हवा दिली. मनसेचे कार्यकर्ते महेंद्र पाचर्णे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टचा स्किनशॉट मोरे यांनी शेअर केला. त्यात लिहिलं की, ‘लिहून ठेवा… पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत वसंत मोरे यांना उमेदवारी मिळाल्यास राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते निवडणूक प्रचारासाठी पुण्यात येतील.’ पाचर्णे पाटील यांच्या पोस्टवर मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘क्या बोलती पब्लिक?’ असं म्हणत निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय थेट जनतेवर सोपवला.

WTC 2023 : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या फायनलपूर्वी टीम इंडियाच्या लूकची सर्वत्र चर्चा

तर मोरे यांनी शेअर केलेल्या या स्किनशॉटवर एका समर्थकाने लिहिलं की, तुम्ही निवडणूक लढवा, आम्ही तुमच्या पाठीशा आहोत. तुमच्यासारखा प्रतिनिधी मिळणं हे भाग्य आहे.

वसंत मोरे हे मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंशी जोडले गेले आहेत. अधूनमधून त्यांच्या पक्षाविरोधात नाराजीच्या बातम्या येत असतात. मोरे पक्ष सोडणार असल्याचेही बोलले जात आहे. मात्र वसंत मोरे हे राज ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचे नेहमीच सांगत आले आहेत. मनसे कार्यकर्त्यांमध्ये त्यांची क्रेझ आहे. त्यामुळेच कार्यकर्त्यांनी मोरे यांनी लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याचा आग्रह धरला. मात्र, गेल्या काही पोटनिवडणुकांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एखाद्या लोकप्रतिनिधीच्या मृत्यूनंतर ती पोटनिवडणूक पक्षाने लढवू नये, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे पुणे लोकसभा पोटनिवडणूक झाल्यास राज ठाकरे हे आपल्या भूमिकेवर ठाम राहतात, की मोरेंना पोटनिवडणुकीच्या आखाड्यात उतरवतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us