WTC 2023 : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या फायनलपूर्वी टीम इंडियाच्या लूकची सर्वत्र चर्चा

भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा फायनल सामना ओव्हम मैदानामध्ये खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ हा सामना खेळणार आहे. यावेळी टीम इंडियाने आपल्या नवीन जर्सीमध्ये फोटोशूट केले आहे.

अनुभवी खेळाडू म्हणून फिरकी गोलंदाजीची जबाबदारी आर. अश्विनच्या खांद्यावरच असेल असं मानलं जात आहे.

विकेटकीपर म्हणून के. एस. भारतला संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलला देखील सलामीसाठी संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

अष्टपैलू खेळाडू म्हणून रविंद्र जडेजाचं स्थान जवळजवळ निश्चित मानलं जात आहे.

भारतीय फलंदाजीचा कणा म्हणून ओखळल्या जाणाऱ्या विराट कोहलीकडून या सामन्यात दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.

विकेटकीपर बॅट्समन म्हणून इशान किशनला संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र यामध्ये त्याची दुखापत आड येऊ शकते.

फिरकीपटू आणि फलंदाज अशी दुहेरी भूमिका बजावणाऱ्या अक्सर पटेललाही प्लेइंग इलेव्हमध्ये संधी मिळू शकते.

मॉर्डन एरामधील राहुल द्रविड अशी ओळख असलेल्या चेतेश्वर पुजारा इतका भरोश्याचा कसोटीपटू सध्या कोणत्याही संघात नाही.

ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव अजिंक्य रहाणेला अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी मिळवून देऊ शकतो.

मोहम्मद शमीचा अनुभव आणि गोलंदाजी पाहता त्याचं स्थान संघात जवळजवळ निश्चित मानलं जात आहे.

मोहम्मद सिराजचाही संभाव्य प्लेइंग इलेव्हन समावेश असू शकतो अशी दाट शक्यता आहे.

शार्दुल ठाकूरचाही संभाव्य प्लेइंग इलेव्हमध्ये समावेश आहे.

जयदेव उनाडकटचाही संघात समावेश होऊ शकतो.
