Video : अमित शहा पुण्यात आले अन् ट्रॅफिकचा बट्ट्याबोळ करून गेले…

Heavy Traffic Jam In Sinhgad Road Pune Due to Amit Shah Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज (दि.4) पुणे दौऱ्यावर आहेत. मात्र, शाहंचा पुणे दौरा सर्व सामान्य आणि चाकरमान्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे. शाहंच्या दौऱ्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आल्याने आणि त्यात पावसाची रिपरिप सुरू असल्याने शहरातील सिंहगड रोड आणि अन्य […]

Letsupp Image   2025 07 04T112015.363

Letsupp Image 2025 07 04T112015.363

Heavy Traffic Jam In Sinhgad Road Pune Due to Amit Shah Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज (दि.4) पुणे दौऱ्यावर आहेत. मात्र, शाहंचा पुणे दौरा सर्व सामान्य आणि चाकरमान्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे. शाहंच्या दौऱ्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आल्याने आणि त्यात पावसाची रिपरिप सुरू असल्याने शहरातील सिंहगड रोड आणि अन्य भागांमध्ये सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Pune Traffic Jam) झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. त्यामुळे अनेकांच्या मनात शाह पुण्यात आले अन् ट्रॅफिकचा बट्ट्याबोळ करून गेले अशीच संतापाची भावना होती.


नोकरदार वर्गाला बसला फटका

पुण्यात पहाटेपासून काही भागात पावसाची रिपरिप सुरू असून, अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहे. त्यात गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्यावर उड्डाणपुलाचेही काम सुरू आहे. त्यामुळे रोजच या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. हा त्रास काय कमी होता त्यात केंद्रीय मंत्र्यांनी आणखी भर टाकली. वाहतूक व्यवस्थेतील बदलामुळे सिंहगड रोड आणि वारजे परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांग पाहण्यास मिळाल्या. यामुळे सकाळी शाळेत जाणारे विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला मोठा फटका बसला.

राजाराम पुलावर देखील मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. जवळपास 1 ते दीड तास लोक रस्त्यावर अडकून पडले होते. आमित शाह यांचा दौरा एनडीए भागात आहे. त्यामुळे पुण्यातील मुख्य रस्त्याची वाहतूक वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र सकाळापासून पाहण्यास मिळाले.

वाहतुकीत मोठे बदल, काही शाळांना सुट्टी, तर काहींच्या वेळेत बदल

शहा आज पुणे दौऱ्यावर असल्याने, त्यांच्या सुरक्षेच्या कारणांमुळे शहरातील काही रस्त्यांवर वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे. त्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसला असून, काही शाळांनी सुट्टी जाहीर केली आहे, तर काहींनी आपल्या वेळेत बदल केला आहे. शहर वाहतूक विभागाने कात्रज ते मंतरवाडी रस्त्यावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत.

दुपारी १२ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मंतरवाडी फाटा ते खडी मशिन चौक आणि कात्रज चौक या दरम्यान मालवाहतूक करणारी वाहने, डंपर, मिक्सर, ट्रक, जड व अवजड वाहने; तसेच स्लो मुव्हिंग वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याशिवाय, बंडगार्डन वाहतूक विभागाच्या हद्दीत, मोर ओढा ते सर्किट हाउस चौक ते आयबी चौक या मार्गावर एकेरी वाहतूक असलेल्या रस्त्यावर आवश्यकतेनुसार दुतर्फा वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.

Exit mobile version