Download App

Video : वैष्णवी हगवणे प्रकरण गाजत असताना बावधन पोलिसांनी अवघ्या दोन मिनिटांत गुंडाळली प्रेस

  • Written By: Last Updated:

Bavadhan Police Press On Vaishnavi Hagawane Death Case : पुण्यासह राज्यभर चर्चेत असलेल्या वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) प्रकरणात सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला आज (दि.23) पहाटे स्वारगेट परिसरातून अटक करण्यात आली आहे. मात्र, एकीकडे सगळीकडे गाजत असलेल्या या प्रकरणात आरोपींना अटक झाल्यानंतर बावधन पोलिसांनी (Pune Police) पत्रकार परिषद घेतली. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी अवघ्या दोनचं मिनिटात या अटकेबद्दल माहिती दिली. एकीकडे हे प्रकरण गंभीर असताना पोलिसांनी अशाप्रकारे दोन मिनिटात पत्रकार परिषद गुंडाळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत वैष्णवी मृत्यू प्रकरणाची माहिती दिली.

Video : अंजली दमानियांकडून पवार कुटुंबावर ट्वीट’वार; करिश्मा हगवणेबरोबर सुनेत्रा पवार अन्…

काय म्हणाले अधिकारी?

अवघ्या दोन मिनिटांच्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले की, “सर्व पुरावे संकलित करून घेतले जात असून हे पुरावे घेऊन योग्य कलमाखाली दोषारोप तयार केला जाईल. या संपूर्ण गुन्ह्याला लॉजिकल एन्डला दोषसिद्धी नेण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तशा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूचना आलेल्या आहेत.असे गायकवाड यांनी सांगितले आणि इतकं बोलून पोलीस अधिकारी जागेवरून उठून निघून गेले.

वैष्णवी हगवणे प्रकरणी पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे – देवेंद्र फडणवीस

वैष्णवी हगवणेचे सासरे आणि दीराला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे. यापुढेही हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता त्या त्या सर्व गोष्टी पोलीस करतील. अशा प्रकारे त्रास देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडणं या गोष्टी कधीच सहन केल्या जाणार नाहीत. त्यामुळे या प्रकरणात जी कडक कारवाई करता येईल ती सगळी केली जाईल असे आश्वासन फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पत्रकारांशी बोलताना दिले आहे.

हगवणे प्रकरणातील चव्हाणचा इतिहासही छळाचाच; वाचा संताप आणणारे कारनामे

मकोका लावणार का? 

वैष्णवी हगवणे मृत्युप्रकणात हगवणे कुटुंबावर मकोका लावणार का? यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, मकोका लावण्याकरता काही नियम आहेत, ते नियमात बसेल की नाही, हे पाहावं लागेल. मात्र, 21 व्या शतकातही मुली आणि सुनांमध्ये फरक करणं फार चुकीचं असून, सूनांना
अशा प्रकारची वागणूक देणे हे पाप आहे.

फडणवीस दादांसाठी बनले ‘ढाल’

 वैष्णवी हगवणे प्रकरणाव एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार गंभीर दिसून आले नाही. कार्यक्रमात बोलताना अजितदादा (Ajit Pawar) यात माझा काय दोष असे म्हणत हास्यविनोदात रंगले असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो यात माझा काय दोष असे म्हणत असताना ते हास्य विनोदात रंगले. सरकार म्हणून गंभीर आहे पण अजितदादा त्यात गंभीर असल्याचं दिसत नाही, असे पत्रकाराने विचारलं. त्यावर फडणवीस म्हणाले, अजितदादा गंभीर नाहीत असं नाही त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की कुठल्याही कार्यकर्त्याकडे किंवा समाजात कुणाकडे लग्नाला बोलावलं तर आपण जातो. त्यावेळी आपल्याला कल्पना नसते की पुढं काय घडणार आहे. एवढंच सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

follow us