मागच्या काही दिवसापासून प्रवासात अनेक प्रकारच्या विकृती करत असलेल्या लोकांच्या घटना समोर येत आहेत. असाच एक प्रकार पुणे ते मुंबई धावणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस (Sinhgad Express) आढळून आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून एक विकृत प्रवासी लपूनछपून महिला प्रवाशांचे व्हिडीओ काढत होता. त्याला प्रवाशांनी रंगेहात पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केले आहे.
या विकृत प्रवाश्याला आज व्हिडिओ काढताना नागरिकांनी रंगेहात पकडला आणि त्याला चांगलाच चोप दिला. मोहम्मद अश्रफ असे व्हिडीओ काढणाऱ्या प्रवाशाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून हा व्यक्ती असे प्रकार करत होता. हा आरोपी मदरशामधील शिक्षक आहे. अटक केल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी मोहम्मदवर विनयभंगासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
Navneet Kaur Rana : जेलमधल्या आठवणी सांगताना रडल्या, पण महविकास आघाडीला दिले नवे आव्हान
आज पुण्यावरून मुंबईला ट्रेन चालली असताना धावत्या ट्रेनमध्ये हा प्रकार समोर आला आहे. त्यावर प्रवाशांनी तात्काळ टिसीला बोलावून ही बाब आणून दिली. त्यानंतर टिसीने कल्याण पोलिसांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तोपर्यंत प्रवाशांनी त्याला पकडून ठेवले होते. स्थानकावर गाडी येताच कल्याण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या काही महिण्यापासून प्रवासात अशा विकृती वाढल्या आहेत, अनेक लोक अशा घटना पाहत आहेत. काही दिवसापूर्वी दारूच्या नशेत एका प्रवाश्याने सहप्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका केली होती. त्यांनतर पुन्हा एकदा विमान प्रवासात सहप्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याची घटना समोर आली होती. आता अशी घटना समोर आल्याने महिला सुरक्षा हा मुद्दा चर्चेत आला आहे.
तयारील लागा! लवकरचं बिगुल वाजणार; चंद्रकांत पाटलांचं पालिका निवडणुकांबाबत मोठं विधान