Download App

पहिल्या एफआयआरमध्ये योग्य कलमं का लावली नाही? या प्रकरणाची न्यायिक चौकशी करा; वडेट्टीवारांची मागणी

पुणे अपघात प्रकरणातील आरोपींना फायदा पोहचवण्यासाठी पोलिसांनी जाणीवपूर्वक तपासात अनेक घोळ केलेत. - विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar : पुण्यातील कल्याणीनगर येथे पोर्श गाडीची (Pune Porsche Accident) धडक देऊन दोन जणांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीच्या विरोधात आता वातावरण चांगलंच तापलं. या अपघात प्रकरणावरून कॉंग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्येही जोरदार जुंपली आहे. दरम्यान, आता विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) हे देखील आक्रमक झाले आहेत.

Pune Porsche Accident : जामीन रद्द! अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी… 

पुणे अपघात प्रकरणातील आरोपींना फायदा पोहचवण्यासाठी पोलिसांनी जाणीवपूर्वक तपासात अनेक घोळ केलेत. यावरून पोलिसांच्या कृतीवर शंका उपस्थित होत आहेत. पहिल्या एफआयआरमध्ये योग्य कलमे का लावण्यात आली नाहीत? असा सवालही वडेट्टीवार यांनी केला.

एफआयआर आणि रिमांड रिपोर्ट मधला फरक तरी कळतो का? धंगेकरांनी मोहोळांना सुनावलं 

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात येऊन पोलिसांनी सुरुवातीपासूनच संबंधित मुलावर कलम ३०४ लावल्याचं म्हटलं होतं. त्यावर रवींद्र धंगेकरांनी फडणवीस पुण्यातील जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका केली होती. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये कलम ३०४ लावलेच नव्हते. तर ते नंतर जोडण्यात आल्याचा आरोप धंगेकरांनी केला होता.त्यानंतर आता विजय वडेट्टीवर यांनीही एक्सवर एक पोस्ट केली.

वडेट्टीवार यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिलं की, आरोपील फायदा पोहचवण्यासाठी पुणे पोलिसांनी तपासात मुद्दान अनेक घोळ केले आहेत. मुळात पहिल्या एफआयआर मध्ये अनेक त्रुटी ठेवल्या होत्या. यावरून पोलिसांच्या कृतीवर शंका उपस्थित होत आहे. घाटकोपर प्रकरणी एसआयटी नेमण्यात आली, तशीच पुण्याच्या प्रकरणाचीही न्यायिक चौकशी व्हावी. आणि पुणे पोलिसांचीही चौकशी झाली पाहिजे. पहिल्या एफआयआरमध्ये योग्य कलमे का लावण्यात आली नाही? ही जनतेची दिशाभूल का केली जात आहे?, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.

दरम्यान, भरधाव वेगात आलिशान पोर्श कार चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या अल्पवयीन आरोपीला आज पुण्यातील बालहक्क मंडळासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.

follow us

वेब स्टोरीज