एफआयआर आणि रिमांड रिपोर्ट मधला फरक तरी कळतो का? धंगेकरांनी मोहोळांना सुनावलं

एफआयआर आणि रिमांड रिपोर्ट मधला फरक तरी कळतो का? धंगेकरांनी मोहोळांना सुनावलं

Ravindra Dhangekar On Muralidhar Mohol : पुण्यातील कल्याणीनगर येथे पोर्श गाडीची धडक देऊन दोन जणांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीच्या विरोधात आता वातावरण चांगलंच तापलं. आता या प्रकरणावरून कॉंग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्येही जोरदार जुंपली आहे. भाजपचे मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी पोलिसांची बाजू घेत पोस्ट एक पोस्ट केली होती. त्याला आता मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकरांना (Ravindra Dhangekar) जोरदार प्रत्युत्तर दिलं.

Shah Rukh Khan: मोठी बातमी! शाहरुख खानची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल 

पोर्शे अपघात प्रकरणात पोलिसांनी एफआयआरमध्ये आयपीसीचे कलम 304 जोडले नाही, असा आरोप करण्यात आला होता. हा आरोप खोटा असल्याचे सांगत मोहोळ यांनी एक्सवर काही फोटो शेअर केले होते. हे फोटो एफआयआरचे असल्याचं म्हणत त्यांनी पोलिसांची पाठराखन केली होती. मात्र, मोहोळ यांनी शेअर केलेली फोटो हे एफआयआरचे नसून ते रिमांड रिपोर्टचे असल्याचे धंगेकर यांनी स्पष्ट केले आहे.

Shekhar Kapoor यांचा ड्रीम प्रोजेक्ट ‘पानी’ लवकरच पुर्ण होणार? रिसर्च सेंटरमधील फोटो व्हायरल 

धंगेकरांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी म्हटलं की, तरी म्हटलं बिल्डरची बाजू मांडायला अजून तुम्ही कसे आला नाहीत? कदाचित अग्रवालची बाजू मांडायला वकील कमी पडले असतील म्हणून तुम्ही ही जबाबदारी घेतली आहे, असा टोला लगावला.

आता एफआयआर आणि रिमांड रिपोर्टमधला फरक समजतो का…? आमचं पहिल्या दिवसापासून आमचे एकच सांगणं आहे की, F.I.R. मध्ये 304 लावण्यात आलेला नाही. का नाही लावला…? सोबत पहिली एफआयर कॉपी जोडतोय. नीट वाचून घ्या, असंही धंगेकर म्हणाले.

इथं 2 कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांच्या घरातील २ कमावती लोकं गेले आहेत. त्यांचे अश्रू पुसायचे सोडून तुम्ही अजूनही पोलीस आणि बिल्डरची बाजू मांडताय….? पुणेकर म्हणून तुम्ही पुण्याच्या जनतेसोबत राहाल अशी माझी अपेक्षा होती. पण, आतापासूनच बिल्डर अन् पोलिसांच्या चरणी आपली निष्ठा वाहत आहात. तीन-चार वाजेपर्यंत पोलिसांना माहिती असतांना पब चालतात, तेव्हा कुठे गेलतात? गृहमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत, पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले असते तर ही घटना घडली नसती, अशी टीका धंगेकरांनी केली.

वाद का पेटला?
गृहमंत्री फडणवीसांनी पुण्यात येऊन पोलिसांनी सुरुवातीपासूनच संबंधित मुलावर कलम ३०४ लावल्याचं म्हटलं होतं. त्यावर धंगेकरांनी फडणवीस पुण्यातील जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका केली होती. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये कलम ३०४ लावलेच नव्हते. तर ते नंतर जोडण्यात आल्याचा आरोप धंगेकरांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला मोहोळांनी प्रत्युत्तर दिलं होतं. खोटे नॅरेटीव्ह सेट करणं सोडून द्या, त्यासाठी तुम्ही काहीही करू शकता. आताच्या निवडणुकीतही तुम्ही तेच केलं व या संवदेनशील प्रकरणातही तेच करत आहे. फडणवीसांनी सांगितलं तेच खरं आहे, असं मोहोळ म्हणाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube